आनंद (बुद्धशिष्य)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

आनंद हा गौतम बुद्धाच्या प्रमुख शिष्यांपैकी एक आणि बुद्धाचा निकटचा सेवक होता. बुद्धाच्या अनेक शिष्यांपैकी आनंदाची स्मरणशक्ती अत्यंत चांगली होती आणि सुत्त पिटकामध्ये असलेली बहुतांश सुत्ते पहिल्या बौद्ध परिषदेदरम्यान बुद्धाने दिलेल्या उपदेशाच्या आनंदला झालेल्या स्मरणावर बेतलेली आहेत. या कारणासाठी आनंदला धर्मरक्षक मानले जाते.

बुद्धाच्या म्हणण्यानुसार भूतकाळातील आणि भविष्यातील प्रत्येक बुद्धाला दोन प्रमुख सहकारी आणि एक सेवक असेल. गौतम बुद्धाच्या बाबतीत सारिपुत्तमहामोग्गलान ही शिष्यांची जोडी तर आनंद हा सेवक होता.

पाली, संस्कृत या भाषांमध्ये तसेच अन्य भारतीय भाषांमध्ये आनंद या शब्दाचा अर्थ 'वरदान' असा होतो. हे लोकप्रिय बौद्ध व हिंदू व्यक्तिनाम असून इंडोनेशियामधील मुस्लिमांमध्येही ते लोकप्रिय आहे.

पहा