सारिपुत्त

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
श्रीपुत्रांचा पुतळा
नालंदा मधील सारिपुत्त स्तूप

सारिपुत्त किंवा शारिपुत्र हे बुद्धांच्या दोन प्रमुख शिष्यांपैकी एक होते. तो अर्हत प्राप्त केले होते, आणि त्यांना त्यांच्या ज्ञानासाठी ओळखले जाते. त्यांचा एक मित्र होता महामौदगल्यायन. ते दोघे एकाच दिवशी घराबाहेर पडले आणि श्रमण झाले. ते प्रथम संजय नावाच्या श्रमानाचे अनुयायी बनले आणि नंतर ते दोन्ही बुद्धांचे अनुयायी बनले. सारिपुत्त आणि महामौदगल्यायन हे बुद्धाचे दोन प्रमुख शिष्य होते. बुद्धांनी अनेकदा सारिपुत्तांचे कौतुक करत आणि बुद्धांनी त्यांना धर्म सेनापती ही पदवीही दिली. बौद्ध धर्माच्या प्रज्ञापारमितह्रिदयसूत्र मध्ये सारिपुत्त आणि अवलोकितेश्वर बोधिसत्त्व यांच्यात झालेली चर्चा आहे. बुद्धांपूर्वी शारिपुत्रांचा मृत्यू झाला.

बाह्य दुवे

साचा:बौद्ध विषय सूची