इंदू जैन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

इंदू जैन (८ सप्टेंबर, १९३६:फैजाबाद, उत्तर प्रदेश, भारत - ) या भारतातील बेनेट, कोलमन ॲंड कंपनी या उद्योगसमूहाच्या अध्यक्षा आहेत.

फोर्ब्स २०१५ च्या क्रमवारीनुसार इंदू जैन यांची संपत्ती ३.१ अब्ज डॉलर होती आणि त्या भारतातील ५७ व्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत तर जगातील ५४९व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती होत्या.[१][२]

व्यावसायिक

जैन यांनी टाईम्स फाउंडेशनची स्थापना केली. द टाईम्स फाउंडेशन ही संस्था पूर, चक्रीवादळे, भूकंप आणि रोगराई यांसारख्या आपत्तींच्या मदतीसाठी समुदाय सेवा, संशोधन संस्था आणि टाईम्स रिलीफ फंड चालवते. जैन ह्या फिक्कीच्या महिला विभागाच्या संस्थापक अध्यक्ष आहेत. एफएलओ मार्च २०१७ च्या भारतीय ज्ञानपीठ ट्रस्टच्या अध्यक्ष आहेत, जे ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ठरले आहे.

जानेवारी २०१६ मध्ये जैन यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्काराने गौरवले..

कौटुंबिक माहिती

त्या साहू जैन कुटुंबातील असून त्यांचे पती अशोक कुमार जैन होते तर व मुले समीर जैन व विनीत जैन आहेत.

अशोक कुमार जैन यांचे हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेनंतर जानेवारी १९९४ रोजी ६५ व्या वर्षी अमेरिकेतील क्लीव्हलॅंड निधन झाले.

साचा:संदर्भनोंदी