Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
ओंकार मांधाता - मराठीपिडिया Jump to content

ओंकार मांधाता

मराठीपिडिया कडून

साचा:ज्ञानसन्दूक मन्दिर

ॐकारेश्वर एक हिंदू मंदिर आहे. हे मध्य प्रदेशच्या खांडवा जिल्ह्यात आहे. हे नर्मदा नदीमध्ये मंधाता अथवा शिवपुरी नामक बेटावर वसलेले आहे. हे भगवान शंकराच्याच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हे मोरटक्का गावापासून जवळपास १२ मैल (२० कि.मी.) अंतरावर आहे. हे द्वीप हिन्दू पवित्र चिन्ह च्या आकारामध्ये बनले आहे. येथे दोन मंदिरे आहेत.

  • ॐकारेश्वर
  • अमरेश्वर

ॐकारेश्वराचा डोंगर नर्मदा नदीकाठी असून त्याचा आकारच ॐ सारखा आहे. नर्मदा भारतातली पवित्र समजली जाणारी नदी आहे. ॐकारेश्वर येथे एकूण ६८ तीर्थ आहेत. याशिवाय २ ज्योतिस्वरूप लिंगांसहित १०८ प्रभावशाली शिवलिंगे आहेत. मध्यप्रदेशात प्रसिद्ध १२ ज्योतिर्लिंगांपैकी २ ज्योतिर्लिंगे आहेत. एक महाकाल नावाचे उज्जैन मध्ये, व दुसरे अमलेश्वर नावाचे ओंकारेश्वर येथे आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
ॐकारेश्वर मध्ये नर्मदा नदी

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

देवी अहिल्याबाई होळकर यांच्या काळापासून येथे एका विशिष्ट दिवशी मातीची १८ हजार शिवलिंगे तयार करून, पूजा केल्यानंतर त्यांचे नर्मदेत विसर्जित करण्याची प्रथा आहे..

कथा[संपादन | स्रोत संपादित करा]

राजा मांधाताने येथे नर्मदा किनाऱ्यालगतच्या पर्वतावर तपस्या करून भगवान शिवाला प्रसन्न केले आणि त्याच्याकडून येथेच निवास करण्याचे वरदान मागून घेतले. तेव्हा पासून ही तीर्थ नगरी ओंकार-मान्धाता या नावानेही ओळखली जाऊ लागली.

ओंकारेश्वरातील अन्य देवळे[संपादन | स्रोत संपादित करा]

ओंकारेश्वर तीर्थ क्षेत्रामध्ये चोवीस अवतार, माता घाट (सेलानी), सीता वाटिका, धावड़ी कुंड, मार्कण्डेय शिला, मार्कण्डेय संन्यास आश्रम, अन्नपूर्णाश्रम, विज्ञान शाला, बड़े हनुमान, खेड़ापति हनुमान, ओंकार मठ, माता आनंदमयी आश्रम, ऋणमुक्तेश्वर महादेव, गायत्री माता मंदिर, सिद्धनाथ गौरी सोमनाथ, आड़े हनुमान, माता वैष्णोदेवी मंदिर, चॉंद-सूरज दरवाजे, वीरखला, विष्णू मंदिर, ब्रह्मेश्वर मंदिर, शेगावचे गजानन महाराज यांचे मंदिर, काशी विश्वनाथ, नरसिंह टेकडी, कुबेरेश्वर महादेव, चन्द्रमोलेश्वर महादेवाचे मंदिरसुद्धा वगैरे देवळे आहेत.

ओंकारेश्वराला कसे जातात?[संपादन | स्रोत संपादित करा]

  • ओंकारेश्वर हे इंदूरपासुन ७७ किमी अंतरावर इंदूर- खांडवा महामार्गावर आहे.
  • ॐकारेश्वर रोड हे रेल्वेस्थानक गावापासून १२ किमी अंतरावर आहे.
  • नर्मदा नदीत होड्या सुरू असतात, त्यांतूनही ओंकारेश्वराला पोहोचता येते.
  • खांडवा शहरापासून ॐकारेश्वर ७२ किमीवर आहे.


उज्जैन ते ओंकारेश्वर[संपादन | स्रोत संपादित करा]

तुम्ही उज्जैन हूून इंदोर मार्गे ओंकारेश्वरला बसने पोहचू शकता. उज्जैन किंवा इंदोर हुन रेल्वे उपलब्ध नाही.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:विस्तार साचा:ज्योतिर्लिंग साचा:ज्योतिर्लिंग मंदिरे साचा:मध्यप्रदेशातील जिल्हे