कन्नड तालुका

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय तालुका कन्नड तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद जिल्ह्याचा एक तालुका आहे. कन्नड या गावी या तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. कन्नड शहर हे तीन दरवाज्याचे शहर म्हणुन प्रसिद्ध होते कन्नड शहरात माळीवाडा येथे वेश (दरवाजा) असून दुसरा दरवाजा काली मस्जिद समोर होता व तिसऱ्या दरवाजाचे आस्तीत्व उपलब्ध नाही. कन्नड शहराला आज कन्नड नावाने जाते मात्र जुने लोक या शहराचे नाव कनकावती होते असे सांगतात. १८८४च्या इंग्रत राजवटीतील गॅजेट मध्ये कन्नड शहराचा उल्लेख ब्राम्हणी नदी व शिवना नदीच्या संगमावर वसलेले शहर अशी नोंद आहे. त्यामध्ये कन्नड शहराचे नाव कन्हेर असे नमुद आहे. या ठिकाणी १८९८ पर्यंत इंग्रज वसाहत लष्कर परिसरात आस्तित्वास असल्याचे दिसते. त्या दरम्यानचे ख्रिश्चन स्मशानभुमी समर्थनगर परिसरात आज ही आस्थिवात आहे. कन्नड पासून पितळखोरा लेण्या केवळ २० की.मी. अंतरावर आहेत. वेरूळ लेण्या २८ की.मी तर अजिंठ्याच्या लेण्या १०० की.मी. अंतर वर आहेत. प्रसिद्ध गौताळा अभयारण्य पाच की.मी अंतरारून सुरू होते. कै आमदार नारायणराव पाटील नागदकर यांनी तालुक्याचा विकास चांगल्या प्रकारे केलेला आहे. महाविद्यालयाची स्थापना, मार्केट कमिटीला जागा, एसटी थांब्याची जागा, या साठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. तालुक्यातील लागवड क्षेत्र १०५६६०.२३ , खरीप गावे-१५६,रब्बी गावे ५६. खरीप क्षेत्र-८६०००, रब्बी क्षेत्र- १९६६०.२३. तालुक्यातील प्रमुख नद्या-शिवना, ब्राह्मनि, अंजना, पूर्णा.मध्यम प्रकल्प- अंबाडी ( आताचे नाव. कै.नारायणराव गीरामाजी पाटील प्रकल्प), गडदगड,.तालुक्यातील ओळीत खातेदारांची संख्या- ६२६७७. कन्नड शहराची लोकसंख्या-३४४०३. तालुक्यातील ग्रामीण भागाची लोकसंख्या- ३५६८६४. तालुक्यातील शासकीय आश्रम शाळा तीन- ब्राम्हणी, वडनेर आणि नागद. स्वस्त द्यान्य दुकाने २०६ +३०. प्राथमिक शाळा २२८, केंद्रीय प्राथमिक २१,माध्यमिक जी.प. -६, खाजगी - ६१, ऐतिहासिक स्थळे- पितळखोरा लेण्या, किले अंतुर, सितान्हान्ही, 'उंच डोंगर"- सुरपाळा. अभयारण्य- गौताळा अभयारण्य. शहरातील महाविध्यालाये दोन+ अध्यापक वि.२+अपंग अध्या.१ अभ्यासक- गणिततज्ञ भास्कराचार्य, ज्योतिषचार्य व कवी दादागुरू जोशी , अहिराणीचे अभ्यासक डॉ. रमेश सूर्यवंशी यांचे या शहरात वास्तव्य.स्वातंत्र चळवळचे मिश्रीलाल पहाडे, सहकार चळवळचे रामचंद्र पाटील, क्रांतीच्या चळवळचे काकासाहेब देशमुख, ग्रामसुधारणेचे रामराव अन्ना बहिरगावकर, तालुक्याचा विकास महर्षी अप्पासाहेब नारायण गीरामाजी पाटील नागदकर यांचे वास्तव्य येथलेच.

इतिहास

फेब्रुवारी १९४४ रोजी निजाम राजवटीत कन्नड ए बलदीया (नगरपालिका) स्थापना झाली होती.  १६ सप्टेंबर १९४८ पर्यंत निजाम राजवटीत प्रमाणे कन्नड नगरपरिषदेचा कारभार चालायचा. १७ सप्टेंबर १९४८ पासुन हैद्राबाद स्टेट अंतर्गत कन्नड नगरपरिषदेचा कार्यभार पाहीला जात होता. १९५४ साली प्रथमच भारतीय संविधान व लोकशाही पद्धतीने निवडणुका होवून लोकनियुक्त स्थानिक स्वराज्य संस्थेचे कार्यकारी मंडळ अर्थात निवडणुक पद्धतीद्वारे नगरसेवक व नगराध्यक्षाची निवड झाली. ३० एप्रिल १९६५ पर्यंत हैद्राबाद स्टेट म्युनिसिपल कॉन्सिल ॲक्ट अंतर्गत कन्नड नगरपरिषदेचा कार्यभार चालत होता. १ मे १९६५ पासुन कन्नड नगरपालीका महाराष्ट्र राज्याचा कायद्या अंतर्गत कारभाराला सुरुवात झाली. आज रोजी पर्यंत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ अंतर्गत कारभार चालु आहे. स्थापने पासुन कन्नड नगरपरिषद ही 'क' वर्ग नगरपरिषद होती. सन २०१६ पासुन कन्नड नगरपरिषद ब वर्ग दर्जाची झाली आहे. आज रोजी जुन्या शहरासाठी १९९२चा विकास आराखडा लागु आहे व नविन शहरासाठी २००६ पासुन नविन विकास आराखडा लागु आहे. कन्नड नगरपरिषदेचे क्षेत्र ४०८ हेक्टर इतके आहे.

शहरांची लोकसंख्या सन १९७१ रोजी १०३९८, सन १९८१ रोजी १६३९१, सन १९९१ रोजी २५४८६, सन २०११ रोजी ४०७५९ या प्रमाणे वाढत गेली. १९५४ पर्यंत रामबावडी येथुन कन्नड शहरास पाणीपुरवठा होत होता. सध्यास्थितीत रामबावडीच्या बाजुची विहिर ही गणपती विसर्जनासाठी वापरण्यात येते. कन्नड शहर हे ब्राम्हणी व शिवाना या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले असुन या भागातील शेतीला पाणीपुरवठा करण्यासाठी सायफल पद्धतीचा बंधरा बांधण्यात आलेला आहे. या द्वारे खालील भागातील शेतीला नैसर्गिक पद्धतीने पाटचाऱ्याद्वारे पाणी सिंचन केल्या जात होते. सदर बंधारा निजाम कट्टा म्हणुन आज ही प्रसिद्ध आहे. परलोक स्मशानभुमि खटकळी माळीवाडा येथे हा बंधारा आजही आस्थित्वात आहे. त्यात प्रमाणे कन्नड शहरात खंडोबाचे मंदिर असुन त्याची यात्रा पौष पोर्णिमेला भरते व सिददीक शाह बाबाची दर्गा असुन येथील ऊर्स होळी नंतर ७ दिवसांनी भरतो. या दोन्ही यात्रेसाठी कन्नड नगरपरिषदेने दोन आठवडी बाजार यात्रे करीता सोडलेले आहे.

कला, वाणिज्य विज्ञान शिक्षण देणारी येथे दोन महाविद्यालये आहेत.

तालुक्यातील शेतक-यांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून अद्रकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली. यावर्षी महाराष्ट्रात अद्रकाची जास्त लागवड झाली. प्रचंड प्रमाणात उत्पादित सर्व अद्रकाची खरेदी होईल एवढी मोठी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही. त्यामुळे अद्रकाचे भाव गडगडले; परंतु परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाल्याने शेतक-यांची होणारी हानी टळली. सध्या कन्नड तालुक्यातून सुरत, इंदूर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठांमध्ये अद्रक विक्रीसाठी जात आहे.

गेल्या दहा वर्षांपासून कन्नड तालुक्यातील शेतकरी आद्रकाचे उत्पादन घेण्यात आघाडीवर आहे. २००६ हे वर्ष सोडले तर इतर वर्षांमध्ये आद्रकला चांगली मागणी होती. हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून तालुक्यात आद्रकाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले.

कन्नड तालुका आद्रक बेणे विक्रीचे माहेरघर बनले. गेल्या पाच वर्षांत येथून मोठ्या प्रमाणात बेणे विक्री झाले. जास्त उत्पादन घेण्यात कन्नड तालुक्याने आद्रकासाठी प्रसिद्ध असलेल्या सातारा व छत्तीसगडलाही मागे टाकले. यावर्षी राज्यात व राज्याबाहेरही आद्रकची जास्त लागवड झाली.२००८ला आद्रकला प्रतिक्विंटल ४ हजार रुपये भाव होता, तर यावर्षी प्रतिक्विंटल ८०० ते १००० रुपये भाव मिळत आहे. प्रचंड उत्पादित सर्व आद्रकाची खरेदी होईल, अशी एकही बाजारपेठ महाराष्ट्रात नाही; परंतु आद्रकास परराज्यात बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. त्यामुळे शेतक-यांचे नुकसान टळले. सध्या कन्नड तालुक्यातील आद्रक सूरत, इंदोर, भोपाळ, झाशी, दिल्ली येथील बाजारपेठेत जात आहे. मजुरी, खते, कीटकनाशके यांच्या किमती वाढल्या, ठिबक सिंचन आदी कारणांमुळे आद्रकचे उत्पादन घेण्यास शेतक-यांना जास्त खर्च लागला. त्यात आद्रकला येथे कमी भाव आहे; परंतु परराज्यातील बाजापेठांमुळे किमान खर्च भागून शेतक-यांच्या शिखात दोन पैसे येत असल्याने शेतकरी समाधानी आहे.

गावे: शिवराई: हे 1 कन्नड़ तालुक्यातील महत्त्वाचे गांव असून येथे अदरक व् कापूस सशेतीसाठी प्रसिद्ध आहे या गावमधे छत्रपति शिवाजी महाराजांचे 1 भव्य स्मारक बनवले आहे. हिराजि बाबा यांचे मंदिर आहे. भगवान बजरंग बलीचे 1 भव्य ऐसे मन्दिरहि आहे. गावत अनेक जतींचे लोक आनंदाने राहतात.

बोरसर (खुर्द): याठिकाणी भवानपूरी महाराज मठ असून दरवर्षी भंडाऱ्याचा कार्यक्रम होत असतो. गावातील बहुतांश लोक वारकरी असून सतप्रवृत्तीचे आहेत. गावातील दत्त भजन मंडळी पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे

जळगाव (घाट): हे शिवना टाकळी मध्यम प्रकल्पा जवळीलच एक छोटेसे खेडे आहे.. या ठिकाणी प.पू. प्रभूनाथ महाराज यांची संजीवन समाधी आहे. दर वर्षी त्यांच्या पुण्यतिथी निम्मित मोठा हरिनाम सप्ताह केला जातो.

आठेगाव: हे गाव तालुुुक्यापासूूून १८ किमी अंतरावर असूूून, गावांमध्ये म्हसोबा या दैवताची दरवर्षी यात्रा भरते. नवसाला पावणारा म्हसोबा अशी या गावाची ख्याती आहे. कापूस, मका, अद्रक इत्यादी पिकांचे सर्वाधिक उत्पन्न गावात होते.

चिंचोली लिंबाजी : हे गाव आई जगदंबेच्या यात्रे साठीखूप प्रसिद्ध आहे एकदा अवश्य भेट द्यावी

साचा:विस्तार साचा:औरंगाबाद जिल्ह्यातील तालुके

पैठण, गंगापूर, कन्नड, वैजापूर, सिल्लोड, खुलताबाद,