कर्माचे प्रकार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

वैदिक कर्मे दोन प्रकारची असतात. प्रवृत्तिपर कर्मे व निवृत्तिपर कर्मे.

प्रवृत्तिपर कर्मे

प्रवृत्तिपर कर्ममार्गाने संसाराची येरझार चालू राहाते

निवृत्तिपर कर्मे

निवृत्तिपर कर्मे ज्ञान किंवा भक्तिमार्गाने मोक्षप्राप्ती होते.

’इष्ट’

श्येनयागादी हिंसामय याग, अग्निहोत्र, दर्श, पूर्णमास, चातुर्मास्य, पशुयाग, सोमयाग, वैश्वदेव, बलिहरण इत्यादी द्रव्यमय कर्मांना ’इष्ट’ म्हटले जाते

’पूर्तकर्मे’

आणि देवालय, बगीचे, विहीरी बांधणे, पाणपोई घालणे यांसारखी लोकोपयोगी कामे ही ’पूर्तकर्मे’ होत. ही सर्व प्रवृत्तिपर काम्यकर्मे आहेत. 

संदर्भ:

श्रीमद् भागवत महापुराण

स्कंध-७ वा-अध्याय १५ वा श्लोक ४७ - ४८