Jump to content

कामदेव

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट हिंदू दैवत कामदेव (Sanskrit: कामदेवIAST: Kāmadeva इंग्रजी : Kamadeva Deity hindu gods of love) हा हिंदू धर्मातील 'प्रेम व कामाची' हिंदू देवता आहे.

कामदेवाची पत्नी रति आहे. हरिवंश पुराण महाभारतानुसार कामदेव आणि रति यांना हर्ष व यश अशी दोन मुले आहेत.[]भागवत पुराणानुसार,कामदेव हा श्रीविष्णू आणि देवी लक्ष्मी यांचा मुलगा आहे.[]श्रीकृष्णरुक्मिणी यांचा पुत्र प्रद्युम्नचा अवतार आहे.[][];वैष्णव सिद्धांतानुसार कामदेवाचे श्रीकृष्णाचे अध्यात्मिक रूप मानतात. हिंदू शास्त्रात कामाची देवता मानली जाते. कामदेवाचा जन्म माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमीला नळगीर येथे झाला असे मानले जाते. कामदेवाचे स्वरूप तरुण आणि आकर्षक आहे. कामदेव हे एवढे शक्तिशाली आहेत की त्यांना कुठल्याही प्रकारच्या संरक्षण कवचाची कल्पना केली गेली नाही. त्यांचे अन्य नावे रागवृंत, अनंग, कंदर्प, मनमथ, मनसिजा, मदन, रतिदेव, रतिकांत, पुष्पवान, पुष्पधंव इत्यादी प्रसिद्ध आहेत.

संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]