केळंबे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

केळंबे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातील गाव आहे.हे गाव दक्षिण कोकणात येते.

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

भौगोलिक स्थान

कोकणातील लांजा बस स्थानकापासून लांजा-वेरवली रस्तेमार्गावर हे गाव ५ किमी अंतरावर स्थित आहे. लांजा एसटी बस स्थानकातून प्रभानवल्ली, हर्दखळे, भांबेड, वेरवली जाणाऱ्या सर्व बसेल येथे थांबतात. लांज्यावरून येथे येण्यासाठी रिक्षासुद्धा उपलब्ध असतात.

हवामान

पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडतो.हिवाळ्यात येथील हवामान सुखद गार असते.उन्हाळ्यातील हवामान गरम असते.येथील जमीन कातळाची असल्याने येथे काजूची भरपूर झाडे आहेत आणि मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यात काजूचे उत्पादन घेतले जाते. गोवा राज्यातील लोकांप्रमाणे फेणी बनविण्यासाठी काजूच्या फळांचा उपयोग येथील शेतकरी करीत नसल्याने ती निसर्गात सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापरली जातात.

लोकजीवन

येथे मुख्यतः कुणबी समाजातील लोक पिढ्यानपिढ्या स्थायिक आहेत. भातशेती, नागलीशेती बरोबरच काजू, फणस, रातांबा,आणि काही प्रमाणात आंबा ह्या फळांचे उत्पादन घेतले जाते. येथे पाणी साठविण्यासाठी कोकणबंधारा बांधलेला आहे त्यामुळे वर्षभर शेती तसेच भाजीपाला, फळभाज्या, फुलभाज्या लागवडीसाठी पाणी पुरवठा उपलब्ध असतो.येथील लोक कष्टाळू, मेहनती, प्रामाणिक,आणि धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे गुण्यागोविंदाने जीवन व्यतीत करीत असतात.

नागरी सुविधा

सार्वजनिक स्वच्छता, आरोग्य, वीजपुरवठा, पाणीपुरवठा ग्रामपंचायतीमार्फत पाहिला जातो. लांजा एसटी बस स्थानकातून येथे येण्यासाठी नियमित बससेवा उपलब्ध आहे.सार्वजनिक आणि खासगी रिक्षासुद्धा दिवसभर येथे ये-जा करीत असतात.