केसरीया स्तूप

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
केसरीया स्तूप

केसरीया स्तूप हा बिहारच्या पूर्व चंपारण जिल्ह्यात, पाटण्यापासून ११० किमी (६८ मैल) अंतरावर असलेल्या केसरीया येथील बौद्ध स्तूप आहे. हा स्तूप ३० एकर परिसरामध्ये पसरलेला आहे. जवळजवळ १,४०० फूट (४३० मीटर) वर्तुळाकार आणि १०४ फूट (३२ मीटर) उंची असलेला हा जगातील सर्वात उंच स्तूप आहे.[१][२]

इतिहास

भारतीय पुरातत्त्वशास्त्रज्ञ के.के. मोहम्मद यांच्या नेतृत्वाखालील केलेल्या उत्खननादरम्यान इ.स. १९५८ मध्ये हा स्तूप सापडला होता. हा स्तूप इ.स. २०० ते इ.स. ७५० या दरम्यान निर्माण झाला असून चौथ्या शतकातील राजा चक्रवर्ती यांच्याशी संबंधित असण्याची शक्यता आहे.[३] स्थानिक लोक या स्तूपाला "देवळा" म्हणतात, म्हणजे "ईश्वराचे घर". या उत्खननापूर्वी, त्यांचा असा विश्वास होता की त्याखाली राजा भिमानेे बांधलेले शिवमंदिर आहे.

भारतीय सर्वेक्षण संस्थेने स्तूपाला राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. पण एक लोकप्रिय पर्यटन आकर्षण असूनही, केसरीया अद्याप विकसित झालेले नाही आणि स्तूपाचा मोठा भाग अद्याप झाडीमध्येच आहे[४]

बुद्ध मुर्ती, केसरीया
बंद केसरीया स्तूप

हेही पहा

साचा:संदर्भनोंदी

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग