गांधी मैदान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान गांधी मैदान (साचा:Lang-pa) किंवा बर्ल्टन पार्क किंवा बी.एस. बेदी स्टेडियम हे जलंधर, पंजाब येथील एक मैदान आहे आणि ते क्रिकेट सामन्यांसाठी वापरले जाते.[१]

इतिहास

मैदानाचे बांधकाम १९५५ मध्ये झाले आणि ते पंजाबउत्तर विभाग ह्या क्रिकेट संघांचे होम ग्राऊंड होते. मैदानावर भारताचा एकमेव कसोटी सामना पाकिस्तानविरुद्ध झाला, त्याशिवाय येथे ३ एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. चंदिगढबाहेर तयार केल्या गेलेल्या मोहाली क्रिकेट मैदानामुळे पंजाबमधील इतर कोणत्या मैदानाला आंतरराष्ट्रीय सामन्याचे यजमानपद मिळण्याची शक्यता अगदी दुरापस्त आहे. ह्या मैदानावर सर्वात मोठी कसोटी धावसंख्या ३७४ ही भारताने पाकिस्तान विरुद्ध येथे झालेल्या एकमेव कसोटीमध्ये उभारली, आणि सर्वाधिक धावा करण्याचे श्रेय अंशुमन गायकवाड (२०१ धावा) कडे आहे. मैदानावर सर्वात जास्त कसोटी बळी वसिम राजा आणि कपिल देव (४ बळी) यांच्या नावावर आहेत. एकदिवसीय सामन्यात सर्वात मोठी धावसंख्या २२६, उभारली ती वेस्ट इंडीजने पाकिस्तानविरुद्ध. सर्वाधिक वैयक्तिक धावा करण्याचा विक्रम दिलीप वेंगसरकरच्या (८८ धावा) नावे आहे, तर सर्वाधिक ३ बळी वेंकटपती राजूने घेतले आहेत.

पाडकाम आणि नवे बांधकाम

सध्या, जलंधर शहरात क्रीडा संकुल बांधण्याची योजना आहे. सध्याच्या मैदानाचा पुनर्विकास करून एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान तयार करण्याची योजना सुद्धा प्रकल्पात समाविष्ट आहे. मात्र सध्याचे सर्वच्या सर्व स्टॅंड पाडले जातील. परंतु कायदेशीर अडथळ्यांमुळे काही काळ प्रकल्पाचे काम थांबले होते. काही महिन्यांनंतर थोडेफार पुनर्बांधकाम दिसू लागले होते. खेळपट्टीचे सुद्धा नव्याने बांधकाम होत असल्याने सध्या मैदानावर कोणतेही सामने खेळवले जात नाहीत, तरीही उदयोन्मुख खेळाडूंचा सराव मात्र थांबवला गेला नाही.

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[२]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२४-२९ सप्टेंबर १९८३ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२० डिसेंबर १९८१ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२५ ऑक्टोबर १९८९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२० फेब्रुवारी १९९४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४ गडी धावफलक

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी साचा:भारतातील क्रिकेट मैदाने