गोसीखुर्द धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

साचा:विस्तार

गोसीखुर्द धरण

नागपूर, भंडाराचंद्रपूर या जिल्ह्यातील सुमारे २,५०,८०० हेक्टर जमीन ओलीताखाली आणणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे.या प्रकल्पास 'इंदिरासागर' असेही नाव आहे.या प्रकल्पाची अंदाजित किंमत सन १९८३ मध्ये सुरुवातीस रुपये ३७२.२२ कोटी इतकी होती.हा प्रकल्प पूर्ण न झाल्यामुळे,याची किंमत वाढत वाढत सध्या सन २०१० मध्ये रुपये ११,५०० कोटी झाली आहे.[१] या प्रकल्पाची सुमारे ९०% कामे पूर्ण होऊनही याचा लाभ नगण्य होत आहे. या प्रकल्पासाठी भंडारा जिल्ह्यातील १०४ गावांचे,नागपूर जिल्ह्यातील ८५ गावांचे तर चंद्रपूर जिल्ह्यातील ११ गावांचे पुनर्वसन करण्यात आले .[२] गोसीखुर्द प्रकल्पांतर्गत महाराष्ट्र राज्यातील गावांजवळ (तालुका-पवनी, जिल्हा-भंडारा) वैनगंगा नदीवर सुमारे ११.३५ किमी लांबीचे धरण बांधण्यात आले आहे. दोन विमोचक, चार उपसा सिंचन योजना व आसोलामेंढा तलावाच्या नुतानिकरनाद्वारे भंडारा, नागपूर व चंद्रपूर जिल्ह्याच्या सुमारे २,५०,८०० हेक्टर जमिनीला सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:महाराष्ट्रातील धरणे