चंद्रकांत हंडोरे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चंद्रकांत हंडोरे

चंद्रकांत दामोधर हंडोरे (जन्म १३ मार्च १९५७) हे महाराष्ट्रातील एक भारतीय राजकारणी आहेत.[१]

ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य आहेत आणि त्यांनी विलासराव देशमुख मंत्रीमंडळात १२व्या महाराष्ट्र विधानसभेत चेंबूरचे प्रतिनिधित्व केले होते.[२] ५ फेब्रुवारी २०२१ रोजी हंडोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली.[३] ते महाराष्ट्र सरकारचे सामाजिक न्यायाचे माजी कॅबिनेट मंत्री आहेत. १९९२ ते १९९३ या कालावधीसाठी त्यांची मुंबईच्या महापौरपदी निवड झाली होती.[४] हंडोरे हे २०१४ ते २०२१ या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष होते. २०२० पासून ते मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रभारीही आहेत. हंडोरे हे आंबेडकरवादी आणि सामाजिक-राजकीय संघटना "भीम शक्ती"चे (अर्थ: "आंबेडकरांची शक्ती") संस्थापक आणि अध्यक्ष आहेत.[५][६][७]

वैयक्तिक जीवन

चंद्रकांत हंडोरे यांच्या आईचे नाव हौसाबाई आणि वडिलांचे नाव दामोधर हंडोरे आहे. त्यांचे लग्न संगिता हंडोरे यांच्याशी झाले आहे, त्या १२५ चेंबूर, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका आहेत. त्यांना सोनल, प्रज्योती, निकिता आणि प्रियांका या चार मुली आणि एक मुलगा गणेश आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने चंद्रकांत हंडोरे यांचे कुटुंब बौद्ध धर्माचे पालन करते.[८][९]

भूषवलेली पदे

संदर्भ

साचा:संदर्भयादी