जंजाळा किल्ला

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

जंजाळा ऊर्फ वैशागड हा औरंगाबाद जिल्ह्यातील एक डोंगरी किल्ला आहे.साचा:संदर्भ हवा

औरंगाबाद-जळगाव-सिल्लोड-गोळेगाव मार्गावर जंजाळा हे गाव आहे. अंभई गावापासून हे १० किलोमीटरवर येते. जंजाळा हे डोंगरमाथ्यावरचे चिमुकले गाव असले तरी अतिशय सुंदर आहे. येथून चार किलोमीटरवर पायी चालत गेल्यावर वैशागड ऊर्फ जंजाळा लागतो. फोडलेल्या तटातून किल्ल्यात प्रवेश होतो. अफाट विस्तार असलेल्या या किल्ल्यावर उद्ध्वस्त इमारतींचे अनेक अवशेष आहेत. खूप तलाव आहेत, पिण्याचे पाणी आहे. गडावरून लांबवरचा मुलुख न्याहाळता येतो.साचा:संदर्भ हवा

जंजाळा गावाच्या कुशीतच ’घटोत्कच’ नावाची प्रसिद्ध बौद्ध लेणी आहेत. ही लेणी इसवी सनाच्या पाचव्या शतकात बांधली गेली. येथे काही शिलालेखही आहेत.साचा:संदर्भ हवा साचा:कॉपीपेस्ट

हे सुद्धा पहा