झाकिर हुसेन (तबलावादक)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:माहितीचौकट गीतकार

उस्ताद झाकीर हुसेन ( ९ मार्च १९५१) हे भारतीय तबलावादक, संगीत दिग्दर्शक आणि तालवाद्यवादक आहेत. हुसेन हे तबलावादक उस्ताद अल्लारखाँ ह्यांचे सर्वात मोठे पुत्र आहेत.[१]

त्यांना १९८८ साली, भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार आणि २००२ साली, पद्म भूषण पुरस्कार राष्ट्रपती अब्दुल कलाम ह्यांच्या हस्ते मिळाला. त्यांना १९९० साली संगीत नाटक अकादमी पुरस्कारानी सन्मानित केले गेले.[२]

सुरुवातीचे आयुष्य आणि शिक्षण

झाकीर हुसेन ह्यांचा जन्म ९ मार्च १९५१ रोजी मुंबई येथे राहणाऱ्या पंजाबी कुटुंबात झाला. हुसेन ह्यांची आई बावी बेगम आणि वडील सुप्रसिद्ध तबलावादक उस्ताद अल्लाह रखा आहेत. त्यांच्या कुटुंबाचे अडनाव कुरेशी असले तरीही झाकीर ह्यांना हुसेन हे आडनाव देण्यात आले.[३] हुसेन ह्यांनी माहीम येथील सेंट माईकल्स हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले. आणि थोड्या काळासाठी त्यांनी सेंट झेवियर कॉलेज, मुंबई येथेदेखील शिक्षण घेतले.

त्यांच्या वडीलांनी हुसेन ह्यांच्या वयाच्या तिसऱ्या वर्षापासून पखवाज शिकवायला सुरुवात केली. अल्लाह रखा हे पंजाबमधील तबलावादनाच्या परंपरेतील होते.[४]

हुसेन ह्यांनी वयाच्या सातव्या वर्षी पहिली मैफिल सादर केली. ते  वयाच्या अकराव्या वर्षापासून वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तबलावादन करायला सुरुवात केली. ते १९७० साली सतारवादक पं. रवीशंकर ह्यांना तबल्याची साथ करण्यासाठी अमेरिकेला गेले.[२]

कारकीर्द

झाकीर ह्यांनी लहान वयापासूनच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील सुप्रसिद्ध वादकांबरोबर साथसंगत करायला सुरुवात केली. त्यांनी पंडित रवीशंकर, उस्ताद विलायत खान, उस्ताद अली अकबर खान, पंडित हरिप्रसाद चौरासिया, पंडित शिवकुमार शर्मा, पंडित व्ही. जे. जोग, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि अशा अनेक गायक आणि वादकांना हुसेन ह्यांनी तबल्याची साथ केली.[२]

वैयक्तिक आयुष्य

हुसेन ह्यांना दोन भाऊ आहेत: उस्ताद तौफिक कुरेशी हे तालवाद्यवादक आहेत आणि उस्ताद फझल कुरेशी हे तबला वादक आहेत.[५]

पुरस्कार

  • पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफमधील) पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार. (२०१७)
  • दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचा 'अकादमी रत्न' पुरस्कार (जुलै २०१९)

प्रकाशित सीडी[६]

  • ईव्हनींग राग (१९७०)
  • शांती (१९७१)
  • रोलिंग थंडर (१९७२)
  • शक्ती (१९७५)

साचा:संदर्भनोंदी

साचा:हिंदुस्तानी संगीत