डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार
साचा:गल्लत साचा:Infobox award डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाद्वारे दिला जाणारा एक पुरस्कार आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती व इतर मागासवर्गीय यांच्यासाठी तसेच शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी, पीडीत, दुर्लक्षित या गरजूंची निष्ठेने सेवा करून सामाजिक क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्ती व सामाजिक संस्थांचा त्यांनी केलेल्या कामाचा यथोचित गौरव व्हावा व कामाची दाद घ्यावी यासाठी शासनाने १९७१-७२ पासून हा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वीत केली आहे. तर १९८९ पासून संस्थाना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पूर्वी या पुरस्काराचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार असे होते.[१]
दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना पुरस्कार देण्यात येतो. २ एप्रिल २०१२ च्या शासन निर्णयान्वये या पुरस्काराचे नाव ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण’ असे करण्यात आले आहे.[२]
निकष व अटी संपादन
महाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[३]
- व्यक्तींसाठीचे निकष
- अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या अपंग, कुष्ठरोगी कल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
- व्यक्तींकरिता वयाची अट पुरुषांसाठी ५० वर्षे आणि महिलांसाठी ४० वर्षे आहे.
- संस्था
- संस्थेत कोणताही गैरव्यवहार नसावा.
- संस्थेचे समाज कल्याण क्षेत्रात उल्लेखनिय कार्य आवश्यक.
- मागील ५ वर्षाचे लेखा परिक्षण अहवाल आवश्यक.
- या संस्था मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम १९५० व संस्था नोंदणी अधिनियम १८६० अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात.
- या संस्था राजकारणापासून अलिप्त असाव्यात.
शिफारश पद्धती संपादन
या पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[३]
- व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
- विना दुराचार प्रमाणपत्र
- गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
- सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
- संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल
पुरस्काराचे स्वरुप संपादन
पुरस्काराची रक्कम प्रती व्यक्ती रू. १५,०००/- व प्रती संस्था रू. २५,०००/- एवढी निश्चित केलेली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ५१ व्यक्ती व १० संस्थाना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी १४ एप्रिल - आंबेडकर जयंती रोजी प्रदान करण्यात येतो.[३]
पुरस्कार विजेते संपादन
१९९२ संपादन
१९९७ संपादन
२००९ संपादन
२०१२ संपादन
- दिलीपराव आगळे
- सिंधुताई सपकाळ[४]
२०१७-१८ संपादन
राज्यातील एकूण ६१ जणांना आणि सहा संस्थांना २०१७-१८ साठीचे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये खालील मराठवाड्यातील व्यक्तींचा समावेश आहे.[५]
- डॉ. ऋषिकेश भीमराव कांबळे
- यादव सीताराम तामगाडगे
- केशव गोरोबा कांबळे
- पंडित केरबा सूर्यवंशी
- माजीद गफूरसाब मोमीन
- भीमराव नागराव हत्तीअंबिरे
- साहेबराव कामाजीराव कांबळे
- सूरजितसिंह रामसिंह वाघमारे (ठाकूर)
- शंकर चन्नापा वीटकर
२०१८-१९ संपादन
हे सुद्धा पहा संपादन
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संबंधित लेखांची सूची
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावे दिले जाणारे पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवनगौरव पुरस्कार
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार
- संत रविदास पुरस्कार
- कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड पुरस्कार
- शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार
- व्यसनमुक्ती पुरस्कार