तंजावुर महाराष्ट्रीय

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

तंजावुरचे महाराष्ट्रीय, म्हणजेच रायर (तमिळ: ராயர் ; उच्चार : रायर्) इसवी सनाच्या सतराव्या शतकापासून तमिळनाडूतील तंजावुर येथे स्थायिक झालेल्या व मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांना तंजावरचे महाराष्ट्रीय असे म्हणतात. लढाईच्या निमित्ताने व मराठी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी निघालेल्या व्यंकोजी उर्फ एकोजी भोसले ह्यांनी सोबत नेलेल्या मावळ्यांनाच आज 'तंजावरी महाराष्ट्रीय' असे संबोधतात तसेच त्यांना रायर असेदेखील म्हणतात. त्यांची राहणी ही महाराष्ट्रातील लोकांच्या राहणीपेक्षा थोडी भिन्न आहे. त्यांच्या भाषा आणि संस्कृतीवर स्थानिक भाषा तमिळ व तेथील जीवनव्यवस्थेचा परिणाम जाणवतो, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी भाषकांना त्यांची बोली समजण्यास अडचण होऊ शकते. तंजावर इथे मराठी भाषकांची वस्ती इसवी सनाच्या सतराव्या शतकाच्या मध्यापासून आहे. तमिळ भाषेच्याच अंगाने व हेलाने बोलली जाणारी तंजावर मराठी ही एक वेगळीच भाषा तंजावरी महाराष्ट्रीय लोक रोजच्या व्यवहारात बोलण्यासाठी वापरतात. पलायकोटा, अरणी, वेलूर येथे वास्तव्यास असलेली अनेक मराठी कुटुंबे तसेच, रामेश्वरम येथील प्रसिद्ध मंदिराचे उपाध्ये/पुजारी हेदेखील मराठीच असून हे ह्याच समुदायापैकी असावेत असा अंदाज आहे.

प्रसिद्ध तंजावरी महाराष्ट्रीय

चित्रपटांमध्ये

"हे राम" ह्या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णी ह्याने श्रीराम अभ्यंकर ह्या तंजावरी मराठी ब्राह्मणाची भूमिका साकारली आहे. त्या चित्रपटात, साकेतराम ही भूमिका साकारणाऱ्या कमल हासन ह्यास अभ्यंकर नावाचा एक महाराष्ट्रीय जेव्हा तमिळ मध्ये बोलू लागतो तेव्हा आश्चर्य वाटते. . त्यानंतर अतुल खुलासा करतो की तो तंजावर इथे स्थायिक झालेला एक महाराष्ट्रीय आहे.

हेही पहा