तरुण सागर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट हिंदू संत मुनी तरुण सागर हे दिगंबर जैन पंथाचे मुनी होते. त्यांची प्रवचने ही कडवे प्रवचन म्हणून प्रसिद्ध आहेत, आणि ती "कडवे प्रवचन" या नावाच्या पुस्तकात संग्रहित केली आहेत. यांची वक्तव्ये ही बऱ्याच वेळा समाज माध्यमामध्ये प्रकाशित केली जायची. यांच्या प्रवचनामध्ये ते कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नावर प्रखरपणे बोलायचे. यांच्या प्रवचनसभेमध्ये जैन लोकांसोबत इतर लोकांची संख्याही खूप राहायची.

प्रारंभिक जीवन

मुनी तरुण सागर यांचा जन्म २६ जून १९६७ रोजी प्रतापचंद्र जैन आणि शांतीबाई जैन यांच्या पोटी झाला, ज्यांना स्वतः आचार्य धर्मसागर यांनी जैन धर्माच्या दिगंबरा पंथात समाविष्ट केले होते, दमोह, मध्य प्रदेश, भारतातील गुहांची या छोट्याशा गावात. त्यांनी वयाच्या १३ व्यावर्षी "क्षुल्लक" म्हणून तर २० जुलै १९८८ मध्ये त्यांनी दिगंबर मुनी म्हणून आचार्य पुष्पदंत सागर यांच्याकडून दीक्षा घेतली.

कार्य

GTV ने "महावीर वाणी" हा कार्यक्रम सुरू केला तेव्हा ते एक प्रमुख व्यक्तिमत्त्व म्हणून उदयास आले. ते नेहमी चालत प्रवास करत परंतु २००७ मध्ये कोल्हापूर प्रवासादरम्यान ते आजारी पडल्यास त्यांनी ढोली वापरण्यास सुरुवात केली. त्यांनी बऱ्याच ठिकाणी आपली प्रवचने दिली आहेत. त्यांनी मध्यप्रदेश आणि हरियाणा विधान सभेला सुद्धा संबोधित केले आहे. ते आपला प्रवास पायी करत. त्यांच्या प्रवाचानांमध्ये ते सामाजिक, राजकीय समस्यांवर प्रखरपणे बोलायचे. हिंसा, भ्रष्टाचार आणि पुराणमतवाद यांच्यावर केलेल्या टीकेसाठी त्यांच्या भाषणांना "कटू प्रवचन" असे म्हटले जायचे. त्यांना देशांमध्ये विविध व्यासपीठावर प्रवचानासाठी बोलवले जायचे. त्यांना क्रांतिकारी राष्ट्रसंत ही म्हणून लोकांमध्ये खूप प्रसिद्ध होते. [१]

निधन

त्यांनी वयाच्या ५१ व्यावर्षी दीर्घ आजाराने ग्रस्त असल्याने १ सप्टेंबर २०१८ रोजी संथारा घेतला.[२]

संदर्भ