ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट संरक्षित क्षेत्र ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा अभयारण्याचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ चौ.कि.मी.क्षेत्र मिळून संयुक्तपणे बनलेला आहे. याचे एकूण क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे.

महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे.येथे एकूण चार बफर झोन आहेत. या प्रकल्पालगतचे सुमारे ११०१.७७ चौ.कि.मी. क्षेत्र त्यात येते. त्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे. मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा असा त्यामागील हेतू आहे.

या प्रकल्पासभोवताली अनेक कोळसा खाणी आहेत. तेथील उत्खननामुळे व करण्यात येणाऱ्या स्फोटांमुळे या क्षेत्राच्या पर्यावरणावर परिणाम होउ शकतो.साचा:संदर्भ हवा

व्युत्पत्ती

ताडोबा आणि अंधेरी प्रदेशातील घनदाट जंगलात राहणाऱ्या आदिवासी लोकांनी पूजेच्या वेळी ताडोबा किंवा ताडो या देवतांचे नाव 'ताडोबा' असे घेतले जाते तर 'अंधेरी' म्हणजे आंध्र नदीचा उल्लेख होय. [१]

पर्यटक माहिती

ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शक सह खुल्या टॉप जीप आणि बसेस अभ्यागतांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणीही मुक्काम उपलब्ध आहे. [२]

सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (उमरेड, भिसी आणि चिमूर मार्गे 140 किमी) हे रेल्वे चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य रेषेवर) द्वारे 45 किमी दूर असलेल्या रेल्वेद्वारे उपलब्ध आहे. सर्वात जवळचे मुख्य बसस्थान म्हणजे चंद्रपूर आणि चिमूर (32 किमी दूर).

वाघांची संख्या

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे ६० व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र)साचा:मराठी शब्द सुचवा यात सुमारे १५ वाघ आढळले आहेत.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन ट्रस्ट तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.साचा:संदर्भ हवा

हे सुद्धा पहा

साचा:विस्तार

साचा:भारतातील अभयारण्ये