दिवाळी (जैन धर्म)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
जैन धर्मीय मंदिरात दिवाळी

जैन धर्मामध्ये दिवाळी सणाच्या विशेष महत्त्व आहे. सर्वात शेवटचे आणि चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांच्या परिनिर्वाणाशी आणि मोक्ष प्राप्तीशी या सणाचा विशेष संबंध मानला जातो.[१] कार्तिक अमावास्या या दिवशी या सणाचे महत्त्व आहे.

महत्त्व

पावापुरी येथे महावीर याणा मोक्ष अवस्था प्राप्त झाली अशी जैन धर्मातील धारणा आहे.अमावास्येच्या पहाटे महावीर यांनी निर्वाण अवस्था प्राप्त केली त्यामुळे हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. याच दिवशी त्यांचे शिष्य गांधार गौतम स्वामी याना ज्ञानप्राप्ती झाली असे मानले जाते. जैन आचार्य जीनसेन यांच्या ग्रंथात दिवाळी सणाचां उल्लेख सापडतो. पावानगरी येथे तीर्थंकर समूहाने दिवे लावून दिवाळी उत्सव साजरा केल्याचे त्यांनी ग्रंथात लिहिले आहे.[२]

स्वरूप

जैन दिवाळी

दिवाळीच्या पहाटे निर्वाण लाडू वर्धमान महावीर यांना अर्पण करण्याची पद्धती आहे. समानता, बंधुता, साधेपणा या मूल्यांचे अनुसरण करीत जैन दिवाळी साजरी करण्यात येते.[३] जैन मंदिरे, घरे, कार्यालये यांचे दिव्यांनी सुशोभन केले जाते. जैन धर्मीय आपले नवे वर्ष प्रतिपदा तिथीला सुरू करतात. वर्धमान महावीर यांच्या अहिंसा तत्त्वाच्या शिकवणुकीचे स्मरण या दिवशी केले जाते.[४]श्र्वेतांबर पंथीय जैन महावीर यांच्या स्मरणार्थ दोन दिवस उपवास व्रत पालन करतात. या दिवशी मंदिराला भेट दिली जाते आणि दिवे प्रज्वलित केले जातात.वाईट शक्ती दूर जाव्यात यासाठी तांदूळ आणि मोहरी परिसरात फेकण्याची प्रथा दिसून येते.[५]

हे ही पहा

संदर्भ