Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
देवराई - मराठीपिडिया Jump to content

देवराई

मराठीपिडिया कडून
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
निलेश्वरम येथील देवराई
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
कन्नूर येथील वडाचे झाड
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
आंबेश्वर देवराई, आंबा(गाव)

देवराई हा जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे असे एक जंगल होय. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. इंग्रजी भाषेत याला (Sacred grove) सेक्रेड ग्रोव्ह म्हणतात.[] सहसा, अशी अरण्ये सरकारच्या वनखात्याने सांभाळलेली नसून परंपरेने समाजाने सांभाळलेली असतात. अशा वनांना अनेकदा शरणवन, अभयारण्य किंवा अभयस्थान असेही म्हटले जाते. देवराया जशा भारतभर विखुरलेल्या आहेत तशा त्या भारताबाहेरही आहेत. काही भागांत देवरायांना ‘चर्च फॉरेस्ट’ असेही म्हटले जाते.[]

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

देवराईचे मूळ वैदिक संस्कृतीपासून सुरू झाल्याचे दिसून येते.[][] देवराई या संकल्पनेचा उगम कसा झाला याविषयी अनेक मतप्रवाह आहेत.[] या संकल्पनेचा मूळ गाभा श्रद्धा या विषयावर बेतला असल्याने, तोच मूळ उद्देश असावा असे अनेक जाणकार मानतात.[]अश्मयुगीन काळात जेव्हा शेतीसाठी जंगलतोड सुरू झाली तेव्हा जंगलाचे महत्त्व देखील लक्षात आले असावे. त्यातून मानवाच्या देवावरील श्रद्धायुक्त भीतीचा योग्य वापर जंगलाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी केला गेला.[]

पर्यावरण आणि जैव विविधता हे शब्द जरी आज आले असले तरीही त्यांच्या संवर्धनाची व संरक्षणाचीची सोय आपल्या पूर्वजांनी फार पूर्वीपासूनच करून ठेवली हीच होती देव राहील एखादं छोटसं दगडी बांधकामाचे देऊळ किंवा कमरेत वाकलेले या झाडाखालचा एक चौथरा आणि उघड्या वर बसलेला तो देव मग तो म्हसोबा, भुतोबा, चाळोबा, वेताळबा, अथवा नावलाई, घाटजाई, वाघजाई, जननी-माता सारखी देवी आणि आसपासच्या परिसरातील एखाद्या वाळवंटातील मरुस्थळ सारखा हिरव्यागार पाचूचा झाडोरा म्हणजेच देवराई (देवराई -धडा एकपर्यावरणाचा २०१२,उमाकांत चव्हाण)

राज्यानुसार देवराई परंपरांची नावे[संपादन | स्रोत संपादित करा]

देवराईसाठी इतर भारतीय भाषांमध्ये वापरले जाणारे शब्द -

  1. कर्नाटक: देवरकडू, नागबन, नागकुडू
  2. राजस्थान: जोगमाया, शरणवन, अभयस्थान
  3. बिहार : सरण्य
  4. ओरिसा : जाहेर
  5. महाराष्ट्र : राय, राई, देवराई
  6. छत्तीसगढ :सरणा, जाईनाथा
  7. केरळ : सर्पकाऊ, नागरकाऊ
  8. तमिळनाडू कोविलकाडू, शोला[][]

याखेरीज देवरहाटी, देवरकंड, सिद्दरवनम, ओरांस अशा वेगवेगळ्या संज्ञा देवराईसाठी आहेत.[१०]

देवराईतील देवता[संपादन | स्रोत संपादित करा]

देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. देवराई ही एक परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही. या सर्व वन-राज्यावर देखरेख करणारी एक सामर्थ्यशाली देवता देवराईत असते.[] ही शक्तिमान देवता बहुतेक तांदळा म्हणजे निराकार पाषाणाची असते. ५० ते ६० टक्के या देवता मातृदेवता असतात.[११] त्या काही ठिकाणी एकेकट्या तर काही ठिकाणी समूहाने असतात. डॉ. धर्मानंंद कोसंंबी यांनी नमूद केल्याप्रमाणे या मातृदेवतांचे वैशिष्ट्य म्हणजे या देवतांपैकी कुणालाही पुरुषसहचर नाही. शिरकाई, वरदाई अशी यांची नावे असतात. पुरुष देवता जेथे आहेत तेथे त्यांची नावे चेलोबा, म्हसोबा, बाजीबुवा, भैरोबा अशी दिसून येतात.[१२]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
दक्षिण भारतातील स्थानिक दैवते

पर्यावरणीय महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

देवाच्या नावाने राखून ठेवले असल्याने या वनाला वृक्षतोडीपासून एकप्रकारचे संरक्षण कवच असते. भारताच्या केवळ पश्चिम घाटासह संपूर्ण भारतात दाट जंगलांचे हे पुंजके आढळतात.[१३]

जगभरातही अशा प्रकारची वने आहेत. ही वने अत्यंत निबिड असतात. देवराईमध्ये उंचउंच वृक्ष, जाडजाड खोडे असलेल्या व कधीकधी जमिनीवर पसरलेल्या महालता, पाऊल बुडेल असा पाचोळ्याचा थर, त्यातून धावणारे नानाविध प्राणी, मधूनच दिसणारे विविध पक्षिगण आणि प्राणी आढळू शकतात. देवराईतील पाण्याचा बारमाही झऱ्यांचा उपयोग आजूबाजूच्या वाड्यावस्त्यांसाठी, गुराढोरांनाही होतो. या देवराया अनेक औषधी वनस्पतींचे भांडार असतात.[१४]

[१५]वनस्पतिशास्त्राच्या विद्यार्थ्यांना देवराई या विषयावर अभ्यास करण्यासाठी वाव आहे.[१६] या देवरायांत विविध प्रकारची शैवाले, भूछत्रे, कवकवर्गी नेच्यांचे अनेकविध नमुने, ओंबळसारखी अनावृत्तबीजी महावेल, आणि अनेक पुष्पवंत वनस्पती, झाडाच्या फांद्यांवर वाढणारी सुगंधी ऑर्किड्‌स असू शकतात.[१७] सर्वेक्षणांनुसार प्राण्यांच्या अनेक दुर्मिळ, नष्ट होत असलेल्या प्रजाती, धोक्याच्या पातळीवर असलेल्या प्रजाती फक्त देवरायात आढळतात. उदा. उत्तर कन्नड जिल्ह्यातील देवरायात असणारे सिंहपूछ वानराचे अस्तित्व.

देवराई म्हणजे नुसते देवाचे ठिकाण किंवा जंगल न्हवते, तर गावाची समृद्धी, संस्कार, परंपरा, व एकोपा याच देवरांनी जपलेला आहे देवराईतील झाडामुळे गारवा तर मिळतोच पण इथल्या वनस्पतींचे जमिनीवरील आच्छादन जमिनीची धूप थांबते या झाडावर यामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता चांगली राहते आजही एंटडा अश्वगंधा शतावरी सारख्या दुर्मिळ औषधी वनस्पती या देवराईत सहज मिळतात याच देवराईत मोठाल्या वृक्षात आपले घरटे करणारे मलबारी धनेश सारखे पक्षी देखील आढळतात गुळवेल हिरडा अर्जुन शतावरी सारख्या वनस्पती मिळतात तर वेगवेगळी उघडे धनेश इत्यादी पक्षी पाहायला मिळतात या देवराईत महाकाय गारबी पिठगुलीच्या वेली लोम्बकळताना दिसतात अनेक दुर्मिळ वनस्पतींची रोपे आणि उत्तम प्रतीच्या बियांचा खजिना या देवराईत सापडतो त्याबरोबरच शुद्ध प्राणवायू हा देखील मिळतो. (देवराई -धडा एकपर्यावरणाचा २०१२,उमाकांत चव्हाण)

अभ्यासाचे महत्त्व[संपादन | स्रोत संपादित करा]

पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयातील संशोधक डॉ. धर्मानंद कोसंबी यांनी देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र, आणि भारतविद्याशास्त्र या दृष्टिकोनातून अभ्यास केला आहे. डॉ. वा.द. वर्तक, डॉ. माधव गाडगीळ, कैलास मल्होत्रा आदी अभ्यासकांनी विसाव्या शतकाच्या मध्यापासून देवरायांचा विशेष अभ्यास केला आहे. डॉ. माधव गाडगीळ हे देवरायांचे तज्ज्ञ मानले जातात.[१८] त्यांचा अभ्यास करताना डॉ. वर्तकांनी १९८३ साली देवरायांमधील जैवविविधतेचे महत्त्व सांगितले. त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने महाराष्ट्रातील देवरायांचे पहिले पथदर्शक सर्वेक्षण केले.[१९][२०]

देवराईचे कार्य[संपादन | स्रोत संपादित करा]

देवरायांच्या अनेकविध कार्यांपैकी वन्य पशु-पक्ष्यांना आसरा देणे,त्यांचे अधिवास म्हणून काम करणे हे एक अत्यंत मूलभूत कार्य आहे.एखाद्या देवराईची प्राणी विविधता किती संपन्न असते हे पुढील घटकांवर अवलंबून असते.त्यातील काही प्रमुख घटकः[२१]

१. देवराईचे भौगोलिक स्थान

२. देवराईचा आकार

३.वनस्पतींची विविधता

४.पंचक्रोशीतील वनांची अवस्था

५.सद्यस्थिती व मानवी हस्तक्षेप

रक्षणाचे प्रयत्न[संपादन | स्रोत संपादित करा]

शहरीकरणाची लाट खेड्यापाड्यापर्यंत पोचली त्यामुळे देवराई ही संकल्पना हळूहळू काळाच्या ओघात धोक्यात आली आहे.[२२] मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे‘ने 'निसर्ग वाचवा' अशा धोरणाला अनुसरून जैव विविधता टिकवण्यासाठी, भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळे ‘हॉट स्पॉट्‌स‘ म्हणून घोषित केलीत. पैकी एक ईशान्य हिमालय [२३] आणि दुसरा पश्चिम घाट. हे दोन्हीही पर्जन्यवनांचे प्रदेश आहेत.

निरीक्षण[संपादन | स्रोत संपादित करा]

१. देवरायांचा उदय, त्यांचे अस्तित्व व संवर्धन याला परंपरा आहे. प्रत्येक देवराईच्या काही विशिष्ट श्रद्धा, संकेत आणि परंपरा आहेत. हजारो वृक्ष आणि त्याच्या शेकडो प्रजातीनी मिळून देवराया बनल्या आहेत.[२४] त्यामुळे देऊळ बांधून त्याच्या आजूबाजूला १०-१२ झाडे लावली की त्याला देवराई म्हणता येणार नाही. देवराईचे क्षेत्र केवढे असावे याला बंधन नाही; मात्र संबंधित गावाशी नाळ त्या क्षेत्राशी जोडलेली असली पाहिजे, असे किमान बंधन आहे. त्याचे संवर्धन करण्याचे काम गावकरी करत असले पाहिजेत.
२. वन विभागाने पाश्चात्य झाडे लावून वाढवलेल्या जंगलास देवराई म्हणता येणार नाही.
३. कोणीही देवराईतील झाडाची फांदीही तोडत नाहीत. सुकलेल्या झाडाची काटकीही घरी घेऊन जात नाहीत. झाडावरचे किंवा झाडावरून खाली पडलेले फूलही देवाला वाहत नाहीत. देवराईत चप्पल घालून जायचे नाही. असे संकेत पाळले जात असतील तरच त्या जंगलाला “देवराई’’ म्हणायचे.
[२५]

महाराष्ट्रातील देवराया[संपादन | स्रोत संपादित करा]

कोकणच्या रत्‍नागिरीसिंधुदुर्ग या दोनच जिल्ह्यांत मिळून सुमारे २,५०० हजार देवरायांची नोंद केली गेली आहे. त्यापैकी १६०० सिंधुदुर्गात तर उर्वरित रत्‍नागिरी जिल्ह्यात आहेत.[२६] ह्या जिल्ह्यांत सुमारे नऊशे ते हजार वेगवेगळ्या वनस्पती आढळतात. त्यांपैकी शंभराहून जास्त दुर्मीळ आणि लुप्तप्राय वनस्पती यांतील बऱ्याच देवरायांमध्ये आहेत. देवरायांच्या बाबतीत रत्‍नागिरी-सिंधुदुर्ग इतके समृद्ध आहेत की जवळ जवळ प्रत्येक गावात एक किंवा दोन देवराया आहेत. देवराई ही बहुधा देवळाभोवती असते. त्यामुळे तिथले अजस्र बुंध्याचे शेकडो वर्षे वयाचेष जुने वृक्ष, महाकाय वेली टिकून आहेत. माडगरुडासारखे पक्षी हे देवरायांचे खरे वैभव होय.[२७] बहुतेक देवरायांमध्ये गुळवेलची आणि खूप विस्तारलेल्या बेहड्याची झाडे आढळतात. कॅन्सर सारख्या दुर्धर रोगावरच्या औषधांत वरदान असलेल्या ‘अमृता’सारख्या वनस्पती काही देवरायांमध्ये दिसतात.आजीबाईंच्या बटव्यातील अनंतमूळ, काडेचिरायत, अशा नेहमीच्या वापरातील औषधी, झाडपाला आणि सीतेचा अशोक वृक्ष देवरायांमध्ये खात्रीने सापडतो. अनेक देवरायांमध्ये जुने वटवृक्ष, हजारो फुले ओघळवणारे बकुळीचे पुरातन वृक्ष, तसेच गच्च केवड्याची बने आहेत. बहुतेक देवरायांमध्ये वड बेल, पिंपळ, आपटा, दासवण, काजरा, कडूकवठ, अशोक, चांदफळ हे वृक्ष आहेत.

महाराष्ट्रातही सुमारे तीन हजार देवराया आहेत. काळूबाई, रानजाई, भैरोबा, ,विंझाई ,म्हसोबा, सोनजाई, आंबेश्वर अशा अनेक देवतांच्या नावाने त्या त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील आदिवासी, गांवकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात विशेषतः पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. पुणे जिल्ह्यात जुन्नर, आंबेगाव, मावळ, मुळशी या तालुक्यात देवरायांची संख्या अधिक आहे.[२८] या देवरांयामध्ये झाडावरचे फूलही निसर्गतःच खाली पडल्याशिवाय देवाला वाहिले जात नाही. देवरायांच्या परिसरात वृक्षतोड, चराई यांनाही बंदी असते. देवराया या जंगलातील आदिवासींनीच जतन केलेले संरक्षित क्षेत्र असल्याने विविध प्रकारचे वनस्पती, प्राणी, कीटक तेथे आश्रय घेतात. कित्येक दुर्मीळ सजीव केवळ देवरायांच्या परिसरात आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडूळ यांच्या जाती तेथे सापडतात. कर्नाटकातील काही देवरायांमध्ये पामच्या दुर्मीळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता तर वाढतेच, पण जमिनीखालच्या पाण्याचेही संवर्धन होत असते.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पश्चिम घाट- ताम्हिणी,पुणे जिल्हा

वैशिष्ट्यपूर्ण देवराया-

१. कुंवारा भिवसन(रामटेक, नागपूर) : मुरुड शेंगेची विपुल झाडे

२. माय गवस देवराई (हेवळे, सिंधुदुर्ग) : सीतेच्या अशोकाची विपुल झाडे

३. स्मृती देवराई (म्हाळुंगे, कोल्हापूर) : पूर्वजांच्या स्मृतीचे जतन

४. जैन पार्श्वनाथ देवराई (इब्राहीमपूर, चंदगड) : बारमाही जलस्रोतांचे रक्षण

५. पेमगिरी महावृक्ष (संगमनेर) : पिंपळाच्या जातीची झाडे

६. भीमाशंकर देवराई (पुणे) : शेकरू या प्राण्याचे संवर्धन [२९]

कोकणातील काही देवराया-[३०]

  • कुंडीची देवराई : या देवराईत तीस फूट घेराचा भला मोठा दासवनाचा वृक्ष आहे.
  • कुरवंड्याच्या राईत कडूकवठाचे अनेक वृक्ष आजही टिकून आहेत.
  • जानवळे-पाटपन्हाळेच्या देवरायांत दासवण, कडू कवठ, अर्जुन, बेल असे वृक्ष मोठ्या प्रमाणावर आढळतात.
  • तामनाळ्याच्या देवराईत राळधुपाचे वृक्ष आहेत.
  • कुंडे, मार्लेश्वर, उजगाव, कुळे, मासरंग येथील देवरायांत पाण्याची कुंडे आहेत.
  • विग्रवली, काटवली, कुरघुंडा, बाशी यांसारख्या देवरायांतही जुन्या विहिरी आणि कुंडेही आहेत. अासपासच्या बाकीच्या ठिकाणी भूगर्भातील पाण्याची पातळी खाली जात असली, तरी देवराईमधल्या जलस्रोतांना भरपूर पाणी असते, आणि उन्हाळ्याच्या दिवसांत गावाचा पाणीपुरवठा इथल्या विहिरींवरच अवलंबून असतो.संगमेश्वर तालुक्यातील धामणी या गावातील बाजीबुवा मंदीर व श्री देवी वाघजाई मंदीर येथील देवराई समृद्ध आहे.
  • सिंधुदुर्ग जिल्ह्यात कडोबा, मोचीमाडजवळ एक वैशिष्ट्यपूर्ण देवराई आहे. येथे एकच झाड आहे आणि ते संरक्षित आहे. दुसरीकडे याच भागातील डोंगोबा कोचऱ्याजवळची देवराई तब्बल १०० एकरांवर पसरली आहे.

देवराईतील वन्यप्राणी[संपादन | स्रोत संपादित करा]

पशू[संपादन | स्रोत संपादित करा]

सर्वच देवरायांमध्ये विपुल प्रमाणात प्राण्यांचे वैविध्य आढळते.[३१]

कोकणाचे वैभव असणारे माडगरुडासारखे पक्षी, भेकर, पिसोरी, ससे, मोर , कोल्हे असे पूर्वी सर्वत्र आढळणारे वन्यजीव देवरायांच्या आश्रयाने राहतात.देवराई आकाराने मोठी असल्यास सांबर, भेकर यासारखे मोठे प्राणी खाद्यशोधार्थ भेट देतात किंवा तात्पुरत्या मुक्कामासाठी येतात.ज्या देवराया सह्याद्रीच्या मुख्य रांगेत आहेत तेथे वर्षभर माकडे असतात.रानडुकरे,शेकरू,उदमांजर,सायाळ,असे प्राणी येथे आढळतात.

पक्षी[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
इंडियन रोलर पक्षी

बहुतेक देवराया पक्षी संपन्न आहेत.डॉ.देब व अन्य यांनी १९९७ मध्ये लिहिताना ,देवराया पक्ष्यांची शेवटची आश्रयस्थाने असल्याचे म्हटले आहे.सूर्यपक्षी,बुलबुल,कुकू,,धनेश ,घुबडे,तांबट ,कोतवाल,पोपट यांच्या विविध प्रजाती देवरायात आढळून येतात असे रत्‍नागिरी जिल्ह्यातील देवरायांच्या सर्वेक्षणात आढळले आहे.[३२]

केरळ राज्यातील देवराया पक्षी वैभवाने समृद्ध आहेत.[३३]

उभयचर[संपादन | स्रोत संपादित करा]

झाडा-झुडपांचे गचपण, पुरेसा आडोसा, गारवा, संरक्षण यामुळे देवराईमध्ये साप, सरडे, पाली, सापसुरळ्या, नागांचे विविध प्रकार कमी-अधिक प्रमाणात वेगवेगळ्या प्रजातीनुसार आढळून येतात. बेडकांचे १०-१२ प्रकार पावसाळ्यात देवराईत आढळतात.

भारतातील देवराया[संपादन | स्रोत संपादित करा]

संपूर्ण भारतात हिमालयाच्या परिसरात[३४] तसेच राजस्थान,कर्नाटक, आंध्र प्रदेश [३५] अशा विविध राज्यात देवराया आस्थेने जपलेल्या दिसून येतात.

भारताबाहेरील देवराया[संपादन | स्रोत संपादित करा]

प्राचीन परंपरांपैकी ग्रीक आणि रोमन संस्कृतीत देवराईचे उल्लेख आढळतात. ओक वृक्षांची देवराई "डोडोना" आणि अथेन्स शहराबाहेरील ऑलिव्ह वृक्षांची संरक्षित भूमी "The Groves of academe" या नावांनी प्रसिद्ध आहे.रोममधील "Roman Forum" आणि इटलीमधील "Bosco Sacro" या देवराया प्रसिद्ध आहेत.नायजेरिया या आणखी एका आफिकन देशात UNESCO World Heritage म्हणून प्रसिद्ध असलेली "Osun-Osogbo" नावाची देवराई आहे.[३६][३७]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
परदेशातील एक राखीव जंगल

काही प्रसिद्ध देवराया[संपादन | स्रोत संपादित करा]

साहित्य व माध्यमांंमधे[संपादन | स्रोत संपादित करा]

  • 'देवराई' या विषयावर उमाकांत चव्हाण यांचे एक छोटे पुस्तक आहे.
  • याच विषयावर 'देवराई' नावाचा सुमित्रा भावे यांनी काढलेला एक पुरस्कारप्राप्त मराठी चित्रपट आहे.अतुल कुलकर्णी यांंची यात महत्त्वाची भूमिका आहे.

संकेतस्थळ[संपादन | स्रोत संपादित करा]

महाराष्ट्रातील देवराया

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

  1. साचा:स्रोत पुस्तक
  2. डॉ. हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  3. साचा:स्रोत पुस्तक
  4. साचा:स्रोत पुस्तक
  5. साचा:स्रोत पुस्तक
  6. ६.० ६.१ साचा:जर्नल स्रोत
  7. दीपक जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक (२०१७)
  8. डॉ.गोखले योगेश, भवताल द्वैमासिक, (दिवाळी विशेषांक) २०१७
  9. साचा:स्रोत पुस्तक
  10. साईली पलांडे दातार, भवताल दिवाळी विशेषांक (देवराई) 2017
  11. साचा:स्रोत पुस्तक
  12. डॉ.हेमा साने, डॉ. विनया घाटे, भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  13. साचा:जर्नल स्रोत
  14. साचा:स्रोत पुस्तक
  15. साचा:स्रोत पुस्तक
  16. साचा:स्रोत पुस्तक
  17. साचा:स्रोत बातमी
  18. साचा:स्रोत पुस्तक
  19. साचा:स्रोत बातमी
  20. साचा:स्रोत पुस्तक
  21. साचा:संकेतस्थळ स्रोत
  22. साचा:स्रोत पुस्तक
  23. साचा:स्रोत पुस्तक
  24. साचा:स्रोत पुस्तक
  25. राजेंद्र जाधव, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक ) २०१७
  26. साचा:स्रोत पुस्तक
  27. साचा:स्रोत बातमी
  28. साचा:स्रोत पुस्तक
  29. साईली पलांडे -दातार, भवताल द्वैमासिक (दिवाळी अंक) २०१७
  30. साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. साचा:स्रोत पुस्तक
  32. डॉ.नलावडे संजीव ,भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक)२०१७
  33. साचा:स्रोत पुस्तक
  34. साचा:स्रोत पुस्तक
  35. साचा:स्रोत पुस्तक
  36. डॉ.तेरवाडकर शार्दुली,भवताल द्वैमासिक (दिवाळी विशेषांक) २०१७
  37. साचा:स्रोत पुस्तक