Jump to content

नामदेव चंद्रभान कांबळे

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक नामदेव चंद्रभान कांबळे (जन्म : शिरपूर-वाशीम, १ जानेवारी १९४८[] - ) हे मराठी लेखक, पत्रकारशिक्षक आहेत. त्यांना राघव वेळ या कादंबरीसाठी इ.स. १९९५मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[]

विदर्भातील वाशीमच्या चपराशीपुऱ्यात राहणाऱ्या कांबळे यांच्या झोपडीला कुडाच्या भिंती होत्या. वीज किंवा नळ नव्हते. येथेच त्यांना अकादमी पुरस्कार मिळाला आणि २५ वर्षांनी पद्मश्री.

नामदेव कांबळे यांच्या आठ कादंबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह आणि दोन ललित संग्रहांखेरीज चरित्र, वैचारिक ग्रंथ अशी त्यांची एकवीस पुस्तके प्रकाशित झाली आहेत. शिवाय अन्य पुस्तकांची अनेक हस्तलिखिते त्यांच्याजवळ आहेत.

कांबळे यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अकल्पित (कविता संग्रह)
  • अस्पर्श (कादंबरी)
  • आपले दादा- दादासाहेब हावरे (चरित्र)
  • ऊन सावली (कादंबरी) - राघववेळचा विस्तार
  • कृष्णार्पण (कादंबरी)
  • गहिवर (कविता संग्रह)
  • गांधी उद्यासाठी (वैचारिक)(+सहलेखक)
  • झाकोळ (कादंबरी)
  • तो:ती:अन्वयार्थ (कविता संग्रह)
  • परतीबंद (कथा संग्रह)
  • प्रत्यय (कविता संग्रह)
  • बळी (कथासंग्रह)
  • महात्मा गांधी आणि डाॅ.आंबेडकर : संघर्ष आणि समन्वय (वैचारिक)[]
  • मोराचे पाय (कादंबरी)
  • राघव वेळ (कादंबरी)
  • शब्दांच्या गावा जावे (भाषणे)
  • समरसता साहित्य- स्वरूप व समिक्षा(समिक्षा)
  • सांजरंग (कादंबरी)
  • सेलझाडा (कादंबरी)
  • सिद्धार्थ (ललित-लेख)
  • स्मरण विस्मरण (लेख संग्रह)

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

शेतमजुराचा मुलगा ते पद्मश्री, वाचा नामदेव कांबळे यांचा थक्क करणारा प्रवास

संदर्भसूची[संपादन | स्रोत संपादित करा]

  1. http://www.loksatta.com/navneet-news/sun-saw-history-in-today-kutuhal-war-and-peace-navneet-34830/lite/
  2. चुका उधृत करा: <ref> चुकीचा कोड; sahitya नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही
  3. साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत