नाशिकराव तिरपुडे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

नाशिकराव तिरपुडे (जन्म - १६ जाने १९२१, मृत्यू १९ मे २००२) हे एक भारतीय राजकारणी असून वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.[१]

ते काँग्रेस पक्षाचे होते. जानेवारी १९७८ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी पक्षात मतभेद निर्माण केले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दर्शविला. पुढील महिन्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (इंदिरा) ने चांगले कामगिरी करून काँग्रेस (मुख्य गट) यांच्या संयुक्त विद्यमाने सरकार स्थापन केल्यानंतर ते नव्या युतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.[२][३][४][५]

त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२१ रोजी गणेशपूर येथे एका दलित कुटुंबात झाला होता. ते आंबेडकरी बौद्ध होते.[२][३][४][५]

१९८६ मध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आणि विदर्भ आंदोलन सुरू केले.[३][४][५] १९९५ मध्ये अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस (आता विलीन) स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते कार्यकारी समिती केंद्रीय संसदीय मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश इंदिरा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.[३][४][५]

१९ मे २००२ रोजी त्यांचे निधन झाले.[३][४][५]

संदर्भ

साचा:संदर्भयादी