पार्क हयात, हैदराबाद

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
पार्क हयात हैद्राबाद

पार्क हयात, हैदराबाद भारताच्या हैदराबाद शहरातील ऐषारामी व आलिशान होटेल आहे. हे २९ एप्रिल २०१२ रोजी हैदराबादच्या बंजारा हिल्स भागात खुले झाले. ज्युबिली हिल्स आणि बंजारा हिल्स या निवासी भागाजवळ रोड क्रमांक २ च्या मध्यभागी हे हॉटेल बांधलेले आहे. चारमिनारपासून १५ मिनिटे अंतरावर, गोवळकोंडा किल्ल्यापासून २० मिनिटे अंतरावर आणि गोल्फ कोर्सपासून १७ किलोमीटर अंतरावर हे हॉटेल आहे. ३२,२५६ चौ.मीटर (३,४७,२०० चौ.फूट) इतक्या जागेवर उभे असलेले भारतातील पहिले आणि पार्क हयातच्या यादीमधील २९ वे हॉटेल आहे.

इतिहास

२००६ मध्ये ३२,२५६ चौ. मीटर (३,४७,२०० चौ.फूट) जागेवर या हॉटेलचे बांधकाम सुरू झाले. हे हॉटेल गायत्री हाय टेक हॉटेल्स यांच्या मालकीचे असून हयात यांचेकडून व्यवस्थापनाचे काम केले जाते. अंदाजे ७ अब्जापर्यंत खर्च झालेल्या हॉटेलचे २९ एप्रिल २०१२ रोजी उद्घाटन झाले आहे.

हॉटेल

या हॉटेलमध्ये १८५ खोल्या असून पहिल्या ६ मजल्यावर २४ कक्ष आणि वरील दोन मजल्यावर द रेसिडेन्स या नावाने ओळखले जाणारे सर्व सोयी सुविधांनी युक्त असे ४२ कक्ष याचा समावेश आहे. हैद्राबादमध्ये या हॉटेलमधील अभ्यागत कक्ष हा सर्वांत मोठा कक्ष म्हणून ओळखला जातो. ४६३ चौ.फूट. प्रवेशद्वाराजवळ चकाकणा-या पाण्याची सजावट आणि ३५ फूट उंचीची पांढरी शिल्पाकृती केलेली आहे. हयात सारखे उच्च अभिरुची जपणारे संपूर्ण भारतामधील हे पहिलेच हॉटेल आहे. १६०० चौ. मीटर ( १७,००० चौ. फूट ) जागेमध्ये महत्त्वपूर्ण बैठका आणि इतर कार्यक्रम आयोजित केल्या जातात. या हॉटेलमध्ये असणारे कक्ष – लिव्हिंग रूम, डायनिंग रुम - पूर्ण दिवस डायनिंग रेस्टॉरंट, ट्री-फोर्नि बार आणि रेस्टॉरंट – नॉर्थन इटालियन खादयगृह , ओरिएन्ट बार आणि स्वयंपाकघर - साऊथ ईस्ट एशियन खादयगृह. या हॉटेलमध्ये स्पा आणि फिटनेस सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.

वैशिष्टये

या हॉटेलमधील वैयक्तिक आणि कौशल्ययुक्त सेवेमुळे अभ्यागतांना आनंद मिळतो. लग्न, सारखपुडा असे वैयक्तिक समारंभ पार पाडण्यासाठी आवश्यक त्या सर्व आधुनिक सुविधा - वाहतूक व्यवस्था, भाडयाने सभागृह, सजावट इ. येथे उपलब्ध आहेत. येथील व्यापारी केंद्रामध्ये व्यापार विषयक बैठका घेण्यासाठी व्यापा-यांना आधुनिक सुविधा - जशा संगणक , फॅक्स, मोबाईल, इंटरनेट यासारखी सर्व यंत्रणेने युक्त कार्यालयीन वर्कस्टेशन्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. उत्कृष्ट दर्जाचे युरोपियन पद्धतीचे खादयगृह पूर्ण वेळ मिळत असून भारतीय पद्धतीचे खादयपदार्थ सुद्धा येथील खादयगृहामध्ये उपलब्ध आहेत. ट्री फोर्नि हे हॉटेलचे इटालियन रेस्टॉरंन्ट असून अतिशय उत्कृष्ट नॉर्थन इटालियन पद्धतीचे खादयपदार्थ उपलब्ध आहेत. ओरिएन्ट बार आणि ईस्ट एशियन खादयगृहामध्ये ‍व्हिस्कि आणि कॉंगनॅक्स या मदयाच्या नमुन्यांचा संग्रह येथे उपलब्ध आहे.

अपंगांसाठी वेगळी सुविधा

रोजच्या रोज अपंग अभ्यागतांची यादी सुरक्षा विभागाला कळविली जाते जेणेकरून त्यांची कोणतीही अडचण असल्यास वैयक्तिक रीत्या लक्ष घालून ती तात्काळ सोडविली जाईल. प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी त्यांना प्राधान्य देण्यात येते आणि सुरक्षा विषयक चौकशीतून त्यांना वगळण्यात येते. हॉटेलमध्ये व्हिलचेअरची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे.

कार्यक्रम

वेगवेगळया कार्यक्रमासाठी आणि सभांसाठी - यूएनडब्ल्यूटीओ, टाटा व्हि-कनेक्ट, मलेशिअन ट्रेड हाय कमिशन, एचएएल पार्लमेंटरी इत्यादी कार्यक्रमांसाठी या हॉटेलचा वापर केलेला आहे.

संदर्भ