पावनखिंडीतील लढाई

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:About

पावनखिंडीतील लढाई १३ जुलै, १६६० रोजी विशाळगडाजवळील असलेल्या घोडखिंडीतील निकराची लढाई होती. छत्रपती शिवाजी महाराज यांचे सेनापती बाजी प्रभू देशपांडे आणि आदिलशाही सरदार सिद्दी मसूद यांच्या सैन्यांत झालेल्या या लढाईत मराठ्यांचे बरेचसे सैनिक मारले गेले परंतु त्यांनी सिद्दी मसूदला खिंडीत थोपवून धरल्यामुळे शिवाजी महाराजांना तेथून निसटून विशाळगडावर जाण्यास वेळ मिळाला.[१][२]

पार्श्वभूमी

साचा:मुख्यलेख शिवाजी महाराजांनी १० नोव्हेंबर, १६५९ रोजी अफझलखानाचा वध केल्यावर मराठा सैन्य विद्युतवेगाने आदिलशाही मुलुख काबिज करीत निघाले होते. वर्ष संपता त्यांनी रुस्तुमे झमान आणि अफझलखानाचा मुलगा फाजल खान यांना हरवून कोल्हापूर जवळचा पन्हाळा जिंकून घेतला.साचा:Sfn याचे पारिपत्य करण्यासाठी आदिलशहाने सिद्दी जौहरला दक्षिणेकडून चाल करण्यास फर्मावले व त्याच वेळी मुघलांशी संधान बांधून उत्तरेकडून हल्ला करविला. शिवाजी महाराज यावेळी पन्हाळ्यावर होते. सिद्दी जौहरने १६६० च्या सुरुवातीस पन्हाळ्याला वेढा घातला आणि किल्ल्याची पूर्ण रसद कापली. अनेक महिन्यांच्या वेढ्यानंतर पन्हाळ्याची स्थिती बिकट झाली आणि किल्ला शिकस्त होणार असे दिसू लागले. यावेळी शिवाजी महाराजांनी तेथून पळ काढून विशाळगडाकडे जाण्याचा बेत आखला.

पन्हाळ्यावरील इंग्रज हल्ले

पन्हाळ्यावर हल्ले करण्यासाठी सिद्दी जौहरने राजापूरच्या इंग्रजांकडून आधुनिक तोफगोळे विकत घेतले आणि इंग्लिश गोलंदाजांनाही नोकरीवर घेतले. या इंग्रजांनी पन्हाळ्यावर हल्ले करीत असताना आपला ध्वज फडकाविला होता. याचा सूड म्हणून शिवाजी महाराजांनी वर्षअखेरी राजापूरची वखार लुटली आणि तेथील चार अधिकाऱ्यांना तुरुंगात डांबून ठेवले होते.साचा:Sfn

लढाई

पर्यवसान

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी