साचा:माहितीचौकट साहित्यिक रघुपती सहाय (उर्दू: فراق گورکھپوری (ऑगस्ट २८, इ.स. १८९६ गोरखपूर, उत्तरप्रदेश - मार्च ३, इ.स. १९८२ नवी दिल्ली) हे प्रसिद्ध उर्दू साहित्यिक फिराक गोरखपूरी या नावाने प्रसिद्ध आहेत.

जीवन संपादन

फिराक गोरखपूरी यांचा जन्म उत्तरप्रदेशमधील गोरखपूर येथे २८ ऑगस्ट इ.स. १८९६ साली झाला होता. त्यांचे शिक्षण अरबी, फारसी आणि इंग्रजी भाषेतून झाले. यांचा विवाह किशोरी देवी यांच्याबरोबर २९ जून इ.स. १९१४ साली झाला. इ.स. १९२० मध्ये आय.सी.एस.ची नोकरी सोडून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्यासाठी त्यांना दिड वर्षाचा तुरूंगवासही भोगावा लागला होता. तुरुंगवास संपल्यावर पंडित नेहरूंनी त्यांना भारतीय काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात सचिवपद दिले होते. हे पद सोडल्यानंतर फिराक गोरखपूरी यांनी इ.स. १९३० पासून इ.स. १९५९ पर्यंत अलाहाबाद विश्वविद्यालयात अध्यापक म्हणून काम केले.[]

साहित्य संपादन

साचा:कॉलम-सुरूसाचा:कॉलम-बंदउर्दू कवितासंग्रह

  • गुल-ए-नग्मा
  • नग्म-ए-साज
  • रूहे-कायनात
  • गजालिस्तान
  • शेरिस्तान
  • शबनमिस्तान
  • रूप

साचा:कॉलम-बंद

  • धरती की करवट
  • गुलबाग
  • रम्ज व कायनात
  • चिरागां
  • शोअला व साज
  • हजार दास्तान
  • बज्मे जिन्दगी

साचा:कॉलम-शेवट

कादंबरी

  • साधु और कुटिया

पुरस्कार संपादन

संदर्भ व नोंदी संपादन

साचा:संदर्भयादी