भवरलाल जैन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

भवरलाल जैन (जन्म : वाकोद-जामनेर तालुका-जळगांव जिल्हा,१२ डिसेंबर १९३७; - २५ फेब्रुवारी २०१६[१]) हे एक भारतीय उद्योगपती आणि समाजसेवक होते. राजस्थानातील जोधपूरजवळील आगोलाई या गावातून जैन कुटुंबीय वाकोद येथे स्थलांतरित झाले होते. भवरलाल जैन हे मुळात एक पारंपारिक शेतकरी होते. पण जळगावला आल्यावर शेती-उद्योग-शिक्षण-आर्थिक विकास आदींमधून त्यांची कारकीर्द बहरली. भवरलाल जैन यांनी ७ हजार रुपयांच्या अल्प भांडवलात उभ्या केलेल्या जैन उद्योग समूहाने पुढे ७ हजार कोटी रुपयांच्या पल्ला गाठला.

जैन उद्योग समूहाने अमेरिकाेतील कॅलिफोर्निया, मेक्सिको, ब्राझील, चिली, इस्रायल, युकेसह जगभरातील देशांत २९ कारखाने उभारले आहेत. कंपनीची १४६ कार्यालये असून तिने २९२९ वितरकांचे जाळे पसरले आहे. असे असले तरेी, जैन उद्योग समूहाचे मुख्यालय जळगावच ठेवले आहे.

भूमिपुत्र असलेल्या जैन यांनी सबंध भारताला सुजलाम सुफलाम करण्याचेही स्वप्न जैन इरिगेशन सिस्टिम लिमिटेडची स्थापना करून पूर्णत्वास नेले. शेती व पाणी नियोजनामुळे असंख्य शेतकरी कुटुंबांना आर्थिक लाभ मिळून, त्यांच्या उत्पन्नात व राहणीमानात सुधारणा झाली. सुमारे २५० नवीन उद्योजकांनी प्रेरणा घेऊन भवरलाल जैन यांच्या औद्योगिक मॉडेलनुसार आपआपल्या औद्योगिक प्रकल्पांची रचना केली. त्यांच्या उद्योगप्रवण प्रेरणेने स्वयंरोजगार-शेतीपूरक लहानमोठ्या उद्योगांत लाखो माणसे लाभदायक कामात गुंतली.

समाजकार्य

भवरलाल जैन यांनी जळगावच्या जैन टेकडीवर 'गांधीतीर्थ' नावाची संस्था स्थापली. ही संस्था म्हणजे विवेक-विज्ञान-आध्यात्मिकतेचे व गांधीवादी विचारांचे जागतिक स्तरावरील जणू खुले विद्यापीठच आहे.

भवरलाल जैन यांना मिळालेले पुरस्कार आणि सन्मान

  • शेती, पाणी, उद्योग या क्षेत्रांत नेत्रदीपक कार्य केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय संस्थांनी त्यांचा गौरव केला. भारतीय विद्यापीठांनी त्यांना डाॅक्टरेट दिली.
  • भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार
  • २४ फेब्रुवारी २०१९ या दिवशी जळगावात जैन यांच्या स्मरणार्थ भवरलाल जैन मराठी सहित्य संमेलन झाले.

सुरेश जैन

जैन कुटुंबातील सुरेश जैन हे शिवसेना या राजकीय पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री आहेत. त्यांना घरकुळ घोटाळा प्रकरणात ७ वर्षांची शिक्षा आणि १०० कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

संदर्भ