मौदा महा औष्णिक विद्युत केंद्र

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मौदा महा औष्णिक विद्युत केंद्र किंवा एन.टी.पी.सी. मौदा हे महाराष्ट्र राज्यातील विदर्भ भागातील नागपूर महसूल विभागात नागपूर जिल्ह्यातील रामटेक उपविभागातील मौदा तालुका येथील एक औष्णिक वीजनिर्मिती केंद्र आहे. हे नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशनच्या कोळशावर आधारित उर्जा प्रकल्पांपैकी एक आहे. २१ मे २०१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १००० मेगावॅटचा पहिला टप्पा देशाला समर्पित केला. [१]

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (बीएचईएल) ही या वीज प्रकल्पातील ईपीसी कंत्राटदार (ईपीसीसी) आहे. [२] [३]

क्षमता

टप्पा युनिट क्रमांक स्थापित क्षमता ( मेगावॅट ) आरंभण तारीख सद्यस्थिती
१ला ५०० मार्च २०१४ सक्रिय [४]
५०० एप्रिल २०१४ सक्रिय [५]
२रा ६६० मार्च २०१६. सक्रिय [६]
६६० मार्च २०१७ सक्रिय [७]
एकूण २३२०

नकाशा

संदर्भ

साचा:संदर्भयादी