Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
नागपूर जिल्हा - मराठीपिडिया Jump to content

नागपूर जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

चित्र:Vidarbha Map.jpg
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

नागपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. हा नागपूर जिल्हा हा भारताच्या जवळजवळ मध्यभागी असून, भारताचा शून्य (0) मैलाचा दगड नागपूर शहरात आहे. देशच्या मध्यभागात असल्याने देशातील महत्त्वाचे लोहमार्ग व महामार्ग नागपूर जिल्ह्यातून जातात. नागपूर शहर हे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे.

पर्जन्यमान[संपादन | स्रोत संपादित करा]

जिल्ह्यातील सरासरी पर्जन्यमान १,२०५ मी.मी. इतके आहे. जिल्ह्यातील मुख्य पीके- ऊस, गहू, संत्री, ज्वारी, तूर, मूग, सोयाबीन, सुर्यफूल, कापूस इ.

नद्या[संपादन | स्रोत संपादित करा]

नागपूर जिल्ह्याच्या पश्चिम सीमेवर वर्धा आणि पूर्व सीमेवर वैनगंगा नदी आहे.

कन्हान ही नागपूर जिल्ह्यातील प्रमुख नदी असून ती जिल्ह्याच्या मध्य भागातून वाहते. ती उत्तरेकडून वाहत येउन पूर्वेकडे जाते आणि जिल्ह्याच्या सीमेवर वैनगंगा नदीला भेटते. तिला लागूनच मौदा हे अतिशय महत्त्वाचा तालुका आहे, तसेच माथणी हे महत्त्वाचे गाव आहे.

सिंचनक्षमता[संपादन | स्रोत संपादित करा]

या जिल्ह्यात लघु सिंचन क्षमता खालील प्रकारे आहेत :[]

  • लघु सिंचन तलाव : १२३
  • पाझर तलाव : ५६
  • गाव तलाव : ३९
  • मालगुजारी तलाव : २१४
  • कोल्हापुरी बंधारे : ७२८
  • साठवण बंधारे : ८८८
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
नागपूर जिल्हा

पर्यटनस्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- दीक्षाभूमी, ड्रॅगन पॅलेस, कामठी, जादू महल, गंगावतरण पुतळा, भारताचा शून्य मैलाचा दगड, मध्यवर्ती संग्रहालय, नागपूर[]

पेंच प्रकल्प आणि राष्ट्रीय उद्यान

अंबाझरी तलाव

रामटेक येथील राममंदिर 

परमात्मा एक सेवक मानवधर्म आश्रम

महाकवी कालिदास स्मारक

मनसर येथील रामधाम

अदासा

आंभोरा

भिवगड किल्ला

सीताबर्डीचा किल्ला

रमण विज्ञान केंद्र

देवलापार येथील गोशाळा

पेंच येथील कुवांरा भिवसन

पारशिवनी येथील घोघरा महादेव

जिल्ह्यातील तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

नागपूर शहर नागपूर ग्रामीण
कळमेश्वर नरखेड काटोल
पारशिवनी रामटेक हिंगणा
मौदा कामठी उमरेड
भिवापूर कुही सावनेर

नागपूर जिल्ह्यातील नेहमी पूरग्रस्त राहणाऱ्या गावांची तालुकानिहाय यादी[संपादन | स्रोत संपादित करा]

ही नागपूर जिल्ह्यातील, पावसाळ्यात नेहमी पूरग्रस्त होणाऱ्या गावांची यादी आहे[]:

तालुका गावे
नागपूर ग्रामीण कोलार, जुनापाणी, सोनुर्ली, किन्हाळ, माकडी, घोटी, मंगरूळ, व्याहाळ
कळमेश्वर
नरखेड खैरगाव, थुगावदेव , बेलोना , मदना, जलालखेडा, खराशी, जाटलापूर,
काटोल सावळी, कोल्हू
पारशिवनी डोरली, साहोली, सिंगोरी, वाघोडा, गौना, नेहंगी,नयाकूळ बखारी, जुनी कामठी, गुंडेगाव, पिपरी, खंडाळा, निलज, करंभाड, कोलितमारा, कुवांरा भिवसेन, नेऊरवाडा, सालई, पाली, माहुली, उमरी.
रामटेक
हिंगणा रायपूर, गुमगाव, कोतेवाडा, सुकळी, देवळी, पेंढरी, हिंगणा, किन्ही, धानोली (रायपूर), खैरी, पन्नासेटाकळी, कान्होलीबारा, खापरी गांधी, सावळी, टाकळघाट, पिपरी, गणेशपूर, शिरूळ, कोतेवाडा गुमगाव, धानोली (टाकळघाट), अडेगाव, गिदमगड, डिगडोह पांडे
मौदा मौदा, माथनी, कोटेगाव, सुकळा, झुल्लर, वढणा, माहखेडी, बार्शी, आष्टी, किरणापूर, वाकेश्वर सिरसोली.
कामठी खापा, सोनेगाव, खेडी, आडका, नेरी.
उमरेड सालई खुर्द, पोही, कळमना, सिंगारी, बोरी माझरा, सावंगी खुर्द, सावंगी बुद्रुक, आष्टा, पवनी, दहेली, पिपरा, हिवरा.
भिवापूर नांद, चिखलपारा, मांडवा, धामणगाव, सालेशहरी, सालेभट्टी, थुटानबोरी, खली, मांगली (जगताप), नक्षी, पांजरेपार
कुही पितूर, भामेवाडा, चिचघाट, मोहगाव, तापेझरी, लाजोर, अवरमारा, सावंगी, पोहरा, गोठणगाव, राजोरी, गोंडपिंपरी, धामणी, पवनी, उमरी, नवेगाव चिचघाट, हरदोली, कोच्छी, पिपरी, माळोदा, जीवनपूर, खराडा, सर्सी, तुडका.
सावनेर

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]