येणेगूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

भौगोलिक स्थान

येणेगूर (इंग्रजी मध्ये: Yenegur) हे महाराष्ट्र राज्यातील उस्मानाबाद[१][२][३] जिल्ह्यातील उमरगा[४] तालुक्यातील एक प्रमुख गाव आहे. येणेगूर हे मराठवाडा प्रशासकीय विभागात येते.

येणेगूरचे अक्षवृत्त व रेखावृत्त अनुक्रमे १७°५१'१२.०" उत्तर आणि ७६°२६'२२.२" पूर्व असे आहेत[५]. येणेगूर हे उस्मानाबाद जिल्ह्याच्या अग्नेय भागात वसले आहे.

बेन्नीतुरा नदी देवबेट टेकडीवर उगम पावते आणि जेवळी, येणेगूर, व मुरूम या गावांच्या पश्चिम दिशेने वाहते.

येणेगूर मध्ये एक जुने करिबसवेश्वर मठ आहे.

येणेगूर हे येथे भरणाया जनावरांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे[६]. प्रत्येक सोमवार येथे मोठा बाजार भरतो[६].

हवामान

येथील वातावरण साधारणपणे उष्ण व कोरडे असते. पावसाळा जून महिन्याच्या मध्यापासून सुरू होऊन सप्टेंबरच्या शेवटी संपतो.ऑक्टोबर ते नोव्हेंबर मध्यापर्यंत दमट वातावरण असते. नोव्हेंबर मध्य ते जानेवारी हिवाळा असतो. फेब्रुवारी ते मार्च वातावरण कोरडे असते. एप्रिल ते जून उन्हाळा असतो.सरासरी वार्षिक पर्जन्यमान ६४० मिलीमीटर असते.

लोकसंख्या

२०११ च्या जनगणनेनुसार येणेगूरची लोकसंख्या ६,७४७[७] इतकी होती, पैकी ३,४०९ पुरूष आणि ३,३३८ स्त्री लोकसंख्या होती. ४,६५६[७] साक्षर लोकसंख्येपैकी २,५५२ पुरूष आणि २,१०४ स्त्री लोकसंख्या साक्षर होती. येथील बोलीभाषा मराठी आहे. काही लोक कन्नड व उर्दू भाषाही बोलतात.

शिक्षण

गावात एक माध्यमिक शाळा (कनिष्ठ महाविद्यालय), एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. तसेच काही इंग्लिश नर्सरी शाळा देखील आहेत.

आरोग्य सेवा

येणेगूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे[८], आणि काही खाजगी इस्पितळे ही गावात आहेत.

इतिहास

१७ सप्टेंबर १९४८ पर्यंत उस्मानाबाद जिल्हा हा निजामाच्या हैदराबाद संस्थान मध्ये समाविष्ट होता, त्यामुळे येणेगूर ही निजामाच्या अधिपत्या खाली होते. नंतर हैदराबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले आणि उस्मानाबाद जिल्हा हा मुंबई राज्याचा एक भाग बनला. राज्य पुनर्रचनेनंतर उस्मानाबाद जिल्हा १ मे १९६० पासून महाराष्ट्र राज्या मध्ये समाविष्ट झाला.

भूकंप

३० सप्टेंबर १९९३ रोजी उस्मानाबादलातूर जिल्ह्यांत भूकंप झाला, त्याला किल्लारीचा[९] भूकंप म्हणून ओळखले जाते. रिश्टर स्केल नुसार या भूकंपाची ६.०४ तीव्रता होती. येणेगूरसह[९] उमरगाऔसा तालुक्यातील ५२ गावांना ह्या भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला[९]. अंदाजे १०,००० लोक मृत्युमुखी पडले. त्यानंतर गावांचे पूनर्वसन करण्यात आले.

वाहतूक

येणेगूर हे रस्ते वाहतूकीने व्यवस्थित जोडले गेलेले आहे[१०][११][१२]. येथून महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस नेहमी धावत असतात.

पुणे-सोलापूर-हैदराबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम(आंध्र प्रदेश) हा राष्ट्रीय महामार्ग ६५[१३] येणेगूर मधून जातो.

मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजयपूर-अथणी-चिकोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक) हा नवीन राष्ट्रीय महामार्ग ५४८बी[१३] येणेगूर जवळून जातो.

येणेगूर हे रेल्वेने जोडलेले नाही. जवळचे रेल्वे स्थानक सोलापूर येथे आहे.

जवळची शहरे

उमरगा-२० किमी, उस्मानाबाद-७४ किमी, तुळजापूर-५२ किमी, नळदुर्ग-२० किमी, सोलापूर-६५ किमी, अक्कलकोट-६० किमी, औरंगाबाद-३१२ किमी, पुणे-३१५ किमी, हैदराबाद-२४७ किमी.

संदर्भ

साचा:Reflist