रघुपती राघव राजा राम

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रघुपती राघव राजा राम हे एक भजन आहे. महात्मा गांधी यांनी आपल्या जीवनात आणि देशकार्यात या भजनाचा विशेष प्रसार केल्याने [१]ते भारतात लोकप्रिय ठरले आहे.[२] या भजनालाच रामधून असेही म्हटले जाते.[३]

श्रीराम पंचायतन मूर्ती

इतिहास

मूळ रचना लक्ष्मणाचार्य यांची असून ती पुढीलप्रमाणे-[४]

रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥


सुंदर विग्रह मेघश्याम गंगा तुलसी शालग्राम ॥


भद्रगिरीश्वर सीताराम भगत-जनप्रिय सीताराम ॥


जानकीरमणा सीताराम जयजय राघव सीताराम ॥


रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥


रघुपति राघव राजाराम पतित पावन सीताराम ॥


- श्रीलक्ष्मणाचार्य

सतराव्या शतकातील मराठी संतकवी समर्थ रामदास यांच्या रचनेवर आधारित या भजनाला पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी संगीतबद्ध केले आहे.[५]

हिंदी रचना

महात्मा गांधी सन १९३१

रघुपति राघव राजाराम,

पतित पावन सीताराम

सीताराम सीताराम,

भज प्यारे तू सीताराम

ईश्वर अल्लाह तेरो नाम,

सब को सन्मति दे भगवान

राम रहीम करीम समान

हम सब है उनकी संतान

सब मिला मांगे यह वरदान

हमारा रहे मानव का ज्ञान


महात्मा गांधी यांनी मूळ भजनावर आधारित ही हिंदी रचना तयार केली. [६]सत्य आणि अहिंसा या तत्त्वांना अनुसरून आपले जीवनकार्य आणि भारतीय स्वातंत्र्यलढा यामध्ये योगदान देताना गांधीजींना या भजनातील तत्त्वज्ञान सर्वसमावेशक वाटले आणि त्यांनी त्याचा अंगीकार केला.

संदर्भ