राजाभाऊ खोब्रागडे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट सभापती भाऊराव देवाजी खोब्रागडे (२५ सप्टेंबर १९२५ - ९ एप्रिल १९८४) हे सामान्यत: राजाभाऊ खोब्रागडे म्हणून ओळखले जाणारे एक भारतीय बॅरिस्टर, आंबेडकरी समाजसेवक आणि राजकारणी होते. १९५८ ते १९८४ पर्यंत ते विविध वेळी भारतीय संसदेच्या राज्यसभा सदनाचे सदस्य होते. इ.स. १९६९ ते इ.स. १९७२ पर्यंत ते राज्यसभेचे उपसभापती होते.[१] खोब्रागडे हे आंबेडकरवादी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय)चे नेते होते.[२][३][४] ते महार (अनुसूचित जाती) समुदायात जन्मले होते आणि १९५६ मध्ये भारतीय घटनेचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासमवेत त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.[२][३][५]

खोब्रागडे यांचे प्रारंभिक शिक्षण चंद्रपूरच्या ज्युबिली हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर त्यांनी इ.स. १९४३ मध्ये नागपूर विज्ञान महाविद्यालयातून इंटर सायन्स आणि १९४५ मध्ये मॉरिस कॉलेज, नागपूर येथून बीएची पदवी मिळवली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सल्ल्यानुसार ते १९५० मध्ये लंडन येथील लिंकन कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी गेले. डॉ. आंबेडकर यांनी लंडनला अभ्यासासाठी पाठवलेल्या १६ विद्यार्थ्यांपैकी ते एक होते परंतु ते स्वतःचा खर्च घेऊन लंडनला गेले होते व बाकीचे शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी होते.[५]

अखिल भारतीय रिपब्लिकन पक्ष हा भारतातील एक राजकीय पक्ष आहे, जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा एक गट आहे आणि त्याचे नेते खोब्रागडे यांच्या नावावरून आहे. बॅरिस्टर राजाभाऊ यंचे नातू राजस खोबरागडे है त्यांचे कार्य पुढे नेण्याच कार्य करीत आहेत. ref name="auto2"/>[३]

सन्मान

भारतीय डाकने २००९ मध्ये खोब्रागडे यांना समर्पित एक टपाल तिकिट काढले होते.[६][७]

संदर्भ