रामचंद्र बाबाजी मोरे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
रामचंद्र बाबाजी मोरे

रामचंद्र बाबाजी मोरे (१ मार्च, १९०३: लादवळी, महाड तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र - ११ मे, १९७२) हे एक राजकीय नेता होते. भारतातील जातिव्यवस्था व भारतीय उपखंडातील वर्ग शोषण या विषयांवर त्यांनी चळवळी केल्या.

सुरुवातीचे जीवन

मोरेंचा जन्म १ मार्च १९०३ रोजी, महाड तालुक्यातल्या लादवळी ह्या गावात एका शेतमजुरी करणाऱ्या एका दलित कुटुंबामध्ये झाला.[१][२]

वयाच्या ११व्या वर्षीच मोरेंनी अस्पृश्यतेविरुद्धचा संघर्ष सुरू केला. काही सामाजिक सुधारकांच्या मदतीने त्यांनी ब्रिटिश सरकारला, महाड माध्यमिक शाळेत प्राथमिक शाळेतून शिष्यवृत्ती मिळाल्यावरही प्रवेश रद्द केला गेल्याबद्दल पत्रे लिहिली.[३][४][५]

राजकीय कारकीर्द

नागरी अधिकार मोहीम

१९-२० मार्च १९२७ या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या महाड सत्याग्रहाचे ते आघाडीचे आयोजक होते.[६][७][८][९][१०][११] मोरेंनी महाड सत्याग्रहाचा तपशीलवार वृत्तान्त मराठीत लिहिला आहे.[१२][१३] महाडच्या दलितांचा चवदार तळे वापरण्यासाठीचा संघर्ष हा निश्चितपणे इतिहासातील पहिला नागरी अधिकारासाठीचा लढा होता.[१०] आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली महाडला झालेल्या मनुस्मृती दहन दिनाचे सुद्धा आयोजक मोरे होते. हा दिवस २५ डिसेंबर १९२७ रोजी संपन्न झाला. त्यामध्ये हजारो दलित लोकांना एकत्रित येऊन मनुस्मृतीची एक प्रत जाळली. महाडला डॉक्टर आंबेडकरांनी दलित महिलांची एक दुसरी सभाही घेतली ज्यात त्यांनी लैंगिक असमानतेचा प्रसार करणाऱ्या सामाजिक रीती थांबवण्याचा संदेश दिला.[५]

कम्युनिस्ट पक्ष

मोरेंनी १९३० साली भारतीय कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला.[३] तरीही मोरे व डॉक्टर आंबेडकर हे एकमेकांच्या कार्यांचे नेहमी प्रशंसक राहिले. कम्युनिस्ट पक्षाच्या अनेक सभेंमध्ये भारतातील जात असमानतेच्या विषयाचा मुद्दा मोरेंनी उचलला. पक्षाच्या १९५३ च्या तिसऱ्या अधिवेशनाअगोदर त्यांनी पक्ष नेत्यांना 'अस्पृशता व जात पद्धतीतल्या समस्या' हा लेख पाठवला.[१४][१५][१६] हा विषय पुढील अधिवेशनात विचारात घेण्यात यावा असे त्यांने पक्ष नेत्यांना निवेदन दिले. १९५७ व १९६४ साली हा लेख पुन्हा सुधारणा करून व वर्ग शोषाणाविरुद्धच्या संघर्षात जात असमानतेविरुद्धा संघर्ष करणे कसे महत्त्वाचे आहे, हे त्यांनी आंबेडकरांचे व्यवस्थित समजावून सांगितले. मोरे यांनी ब्रिटिश सरकार विरुद्धच्या स्वातंत्र्य संघर्षात व कामगार चळवळीतसुद्धा समर्थपणे लढा दिला. १९६४ मध्ये भारतीय कम्यनिस्ट पक्षात फूट पडल्यावर मोरे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षात दाखल झाले. .[१६] माकपच्या महाराष्ट्र राज्य समिती मध्ये १९६४ मध्येच त्यांची निवडणूक झाली. 'जीवनमार्ग' हे माकप महाराष्ट्र समितीचे साप्ताहिक त्यांनी १४ एप्रिल १९६५ (आंबेडकर जयंती) रोजी सुरू केले.[५]

मोरेंचा ११ मे १९७२ रोजी मृत्यू झाला, ते शेवटपर्यंत माकपचे नेते राहिले.

संदर्भ

साचा:संदर्भयादी