Jump to content

रामदुर्ग संस्थान

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भूतपूर्व देश रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारतातील मुंबई इलाख्याच्या अंतर्गत डेक्कन स्टेट्स एजन्सीतील एक संस्थान होते. या संस्थानाची राजधानी रामदुर्ग मध्ये होती.

क्षेत्रफळ[संपादन | स्रोत संपादित करा]

रामदुर्ग संस्थानाचे क्षेत्रफळ ४३८ चौरस किमी होते.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

रामदुर्ग संस्थान हे इ.स. १७४२ या वर्षी नरगुंड संस्थानापासून वेगळे झाले. हैदर अली आणि टिपू सुलतानाच्या काळात (१७८५-१७९९) हे संस्थान म्हैसूर राज्याचा भाग होता. इ.स. १८२७-१८२९ या काळात रामदुर्ग संस्थान हे ब्रिटिश भारताचा भाग बनले. भारत स्वतंत्र झाल्यावर ८ मार्च, इ.स. १९४८ या दिवशी रामदुर्गच्या संस्थानिकांनी हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन केले. सध्या हे संस्थान कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

संस्थानिक[संपादन | स्रोत संपादित करा]

रामदुर्ग संस्थानाचे संस्थानिक भावे घराणे होते. ते हिंदू कोकणस्थ ब्राह्मण आहेत. ते 'राजा' हे शीर्षक वापरत असत.

शासनकाळ (इ.स.) शासक
१७४२-१७७७ राजा योगीराव भावे (प्रथम)
१७७७-१७८५ राजा रामराव भावे (प्रथम)
१७८५-१७९९ म्हैसूर राज्याच्या अंतर्गत
१८००-१८१० श्री.बापूराव रानडे - राजप्रतिनिधी
१८१०-१८२७ राजा नारायणराव रामराव तथा आप्पासाहेब भावे (प्रथम)
१८२७-१८२९ ब्रिटीश प्रशासनाच्या अंतर्गत
१८२९-१८५७ राणी राधाबाई भावे
१८५७-१८७२ राजा रामराव नारायणराव भावे (द्वितीय)
१८७२-१८७८ राजा योगीराव तथा बापूसाहेब भावे (द्वितीय)
१८७८-१९०७ राजा व्यंकटराव योगीराव भावे
१९०७-१९४८ राजा रामराव व्यंकटराव तथा रावसाहेब भावे (तृतीय)