रोइंग (शहर)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

रोइंग हे भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातल्या दिबांग घाटी ह्या जिल्ह्यातील ब्रम्हपुत्रा नदीच्या काठी वसलेले एक शहर आहे. रोइंग जिल्ह्याचे हे मुख्यालय आहे. रोइंगहून इटानगर (अरुणाचल प्रदेशाची राजधानी) ३०० किलोमीटर अंतरावर आहे. २०११ च्या लोकसंख्या गणनेनुसार रोइंग शहराची लोकसंख्या ११३८९ एवढी आहे. पुरुष लोकसंख्या ६०६४ असून महिला लोकसंख्या ५३२५ एवढी आहे. येथले साक्षरता प्रमाण ८८.३९% आहे. पुरुष साक्षरता प्रमाण ९१.९४% असून महिला साक्षरता प्रमाण ८४.३५% एवढे आहे.[१]

जवळची पर्यटन स्थळे

रोइंग येथून ४ किलोमीटर अंतरावर सॅलिलेक रिसॉर्ट आहे. या सरोवराभोवती घनदाट जंगल असून मोठ्या प्रमाणावर पक्षी आढळतात. येथे खाटीक, सूर्यपक्षी, सुलतान टीट यांसारख्या अनेक जातींचे पक्षी आहेत. रोइंग शहराच्या उत्तरेला १२ किलोमीटर अंतरावर रुक्मिणीनाती किल्ल्याचे अवशेष पाहायला मिळतात. शहरापासून ११५ किलोमीटर अंतरावर मेहाओ सरोवर आहे. रोइंगपासून २४ किलोमीटर अंतरावर भीष्मकनगर परिसरात झालेल्या उत्खननात सापडलेला विटांचा राजवाडा पाहायला मिळतो.[२]

दळणवळण

दिब्रुगडचा मोहनबारी विमानतळ हा रोइंगसाठी सर्वात जवळचा विमानतळ आहे. दर बुधवारी तेझू ते मोहनबारी अशी हेलिकॉप्टर सेवा आहे. रोइंगकरिता जवळचे रेल्वेस्थानक तिनसुकिया येथे आहे. पासीघाट येथून नावेने सियांग नदी पार करून रोइंग येथे पोहोचता येते. दिब्रुगड, तिनसुकिया,इटानगर येथून बसेस मिळतात.[२]

संदर्भ