लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी (जानेवारी २७, १९०१ - मे २७, १९९४) हे मराठी लेखक, कोशकार व सामाजिक शास्त्रांचे अभ्यासक-संशोधक होते. जोशींचा जन्म धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आणि शिक्षण वाई येथील प्राज्ञ पाठशाळेत झाले. त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभाग घेतला होता. त्याकरिता इ.स. १९३२ साली त्यांना तुरुंगात जावे लागले.

संस्कृत भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते हिंदू धर्माचा त्यांनी सखोल अभ्यास केला होता. वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत इत्यादी शास्त्रांवर ते अधिकारवाणीने बोलू शकत. हिंदू तत्त्वज्ञान त्यांनी चांगल्या प्रकारे अवगत केले होते.

प्रकाशित साहित्य

  • वैदिक संस्कृतीचा विकास
  • मराठी विश्वकोश (संपादन)
  • धर्मकोश (एकूण १६ खंडांचे संपादन)
  • विचारशिल्प
  • आधुनिक मराठी साहित्य
  • समीक्षा आणि रससिद्धांत
  • हिंदू धर्मसमीक्षा
  • श्रीदासबोध
  • राजवाडे लेख संग्रह (संपादन)
  • उपनिषदांचे भाषांतर
  • संस्कृत संहितेचे वर्गीकरण (Catalogue of Sanskrit Scripts)

समाजकार्य

  • महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा व राज्य ग्रंथ पुरस्कारांची सुरुवात

पुरस्कार

गौरव

  • अध्यक्ष, मराठी साहित्य संमेलन दिल्ली १९५४
  • प्रथम अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक महामंडळ १९६० - १९८०
  • मराठी विश्वकोशाचे आद्य संपादक

इतर

  • प्रा. रा.ग. जाधवांनी शास्त्रीजी हा तर्कतीर्थांच्या कार्याचा परिचय देणारा ग्रंथ लिहिला आहे.

बाह्य दुवे


साचा:मराठी साहित्यिक