लोकदैवत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:ज्योतिबा.jpg
श्री.ज्योतिबा प्रसन्न

लोकदैवत ही समाजजीवन आणि लोकसंस्कृती या विषयांशी संबंधित संकल्पना आहे.[१]

इतिहास

केशवराज मंदिर आसूद गाव (दापोली) येथील लोकदेवता

समाजजीवनामधे लोकांच्या मनातील श्रद्धेतून विविध देवतांचा विकास झाला आहे. या देवतांना लोकदैवते असे म्हटले जाते. स्थानिक पातळीवर या देवतांचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान असते. भारतीय संस्कृतीच्या इतिहासात वेदपूर्व काळापासून लोकदैवत ही संकल्पना मान्यता पावलेली दिसून येते.[२] केवळ महाराष्ट्रात अथवा भारतातच [३]नाही तर संपूर्ण जगभरात[४] विविध संस्कृतींमध्ये लोकदैवत ही संकल्पना पूजनीय मानली गेली आहे.[५][६]

स्वरूप आणि विकास

लोकदैवत हे मूर्तीच्या रूपात पूजिले जाते किंवा काही वेळा एकादी शिळा, दगड, काठी, एखादी रिकामी राखीव सोडलेली जागा असेही लोकदैवताचे स्वरूप असते. देवीच्या उपासनेतील लज्जागौरी हे लोकदेवतांच्या उपासनेतील वैशिष्ट्यपूर्ण दैवत आहे. विष्णू, शंकर, गणपती या पुराणकालीन देवतांचे अंशही स्थानिक पातळीवर लोकदैवतांमध्ये पूजनीय मानले जातात. गावातील शेताच्या बांधावर असलेली म्हसोबा, विरोबा, क्षेत्रपाल ही दैवते शंकराची रूपे मानली जातात. गावाच्या वेशीचे रक्षण करणारा हनुमान हा सुद्धा लोकदैवत म्हणून मान्यता पावलेला आहे. देवीच्या उपासनेतील काळूबाई, मांढरदेव, लज्जागौरी, साती आसरा , जाखाई यासुद्धा लोकदेवता म्हणूनच पूजिल्या जातात. [७]या देवतांच्या स्थानाईक पातळीवर आख्यायिका प्रचलित असतात आणि श्रद्धेने त्याकडे पाहिले जाते.[८]

देवराई ही सुद्धा लोकदेवतांच्या उपासनेतील महत्त्वाची संकल्पना आहे.जंगलाचा एखादा विशिष्ट भाग हा ग्रामदेवता किंवा स्थानदेवता यासाठी राखीव ठेवला जातो आणि त्यावर संबंधित देवतेचे नियंत्रण असते अशी समाजाची धारणा असते. या देवराईतील खाली पडलेले पानदेखील उचलून आणण्याला मनाई असते.

महाराष्ट्रातील लोकदैवते

महाराष्ट्र राज्यातील जेजुरी येथील खंडोबा, वाडी रत्‍नागिरी- कोल्हापूर येथील ज्योतिबा, माहूर येथील रेणुकामाता ही प्रसिद्ध लोकदैवते आहेत. या लोकदैवतांच्या उपासक समुदायाला समाजात महत्त्वाचे स्थान आहे. वाघ्या- मुरळी, पोतराज, गोंधळी, भुत्या अशा विविध उपासकांच्या उदरनिर्वाहाची काळजी देखील महाराष्ट्रातील ग्रामीण भागातून घेतली जाते हे आधुनिक काळातही अनुभवाला येते.[९]

चित्रदालन

संदर्भ