Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
खम्मम जिल्हा - मराठीपिडिया

साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
पामुलापल्लीजवळील रथम टेकड्या

खम्मम हा भारताच्या तेलंगणा राज्यामधील एक जिल्हा आहे. २०१४ सालापूर्वी हा जिल्हा आंध्र प्रदेश राज्याच्या अखत्यारीमध्ये होता. खम्मम येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे.

प्रमुख शहर संपादन

भूगोल संपादन

खम्मम जिल्ह्याचे क्षेत्रफळ ४,३६१ चौरस किलोमीटर (१,६८४ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा सूर्यापेट, महबूबाबाद, भद्राद्री कोठगुडम जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश राज्यासह आहेत. जिल्ह्याचा मध्य व पूर्व भाग प्रामुख्याने डोंगराळ आहे. गोदावरी ही येथून वाहणारी प्रमुख नदी आहे.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्याखम्मम जिल्ह्याची लोकसंख्या १४,०१,६३९ आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९७ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६५.९५% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २२.६% लोक शहरी भागात राहतात. []

खम्मम जिल्हा प्रामुख्याने ग्रामीण स्वरूपाचा असून तो भारतामधील २५० सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक आहे.[]

मंडळ (तहसील) संपादन

खम्मम जिल्ह्या मध्ये २१ मंडळे आहेत:[] खम्मम आणि कल्लूरु ही दोन महसूल विभाग आहेत.

अनुक्रम खम्मम महसूल विभाग अनुक्रम कल्लूरु महसूल विभाग
बोनाकल १६ कल्लूरु
चिंतकानी १७ तल्लाडा
रघुनाथपलेम (नवीन) १८ एन्कुरु
खम्मम (ग्रामीण) १९ पेनुबल्ली
खम्मम (शहरी) २० सत्तुपल्ली
कोनिजर्ला २१ वेमसूर
कुसुमंची
मथिरा
मुदिगोंडा
१० नेलकोंडापल्ली
११ कामेपल्ली
१२ सिंगरेनी
१३ तिरुमलायपालेम
१४ वैरा
१५ एरुपालेम


हे देखील पहा संपादन


बाह्य दुवे संपादन

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:तेलंगणामधील जिल्हे