सूर्यापेट जिल्हा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:About साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

सूर्यापेट जिल्हा हा भारताच्या तेलंगणा राज्यातील राज्यातील जिल्हा आहे. सूर्यापेट येथे ह्या जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. सूर्यापेट जिल्हा हा पूर्वीच्या नालगोंडा जिल्ह्यापासून बनलेला आहे.[१]

सूर्यापेट हे ऐतिहासिकदृष्ट्या तेलंगणा सशस्त्र संघर्षातील रझाकारांविरुद्धच्या चळवळीचे केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. सूर्यपेट हा आता वेगाने विकसित होत असलेला सिमेंट उद्योग असलेला प्रदेश आहे. कृष्णा नदीचे खोरे विस्तीर्ण पसरलेल्या या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर शेती आहे तर नागार्जुन सागराचा डावा कालवा हा सिंचनाचा मुख्य स्त्रोत आहे. सूर्यापेट हे अनेक शिव मंदिरांनी सुशोभित केलेले आहे जे काकतीय राजवटीत बांधले गेले होते आणि प्रत्येकाला या परिसराच्या गौरवशाली भूतकाळाची आठवण करून देतात.

प्रमुख शहर

भूगोल

सूर्यापेट जिल्ह्याचे क्षेत्रफळ ३३७४.४१ चौरस किलोमीटर (८४५ चौरस मैल) आहे. जिल्‍ह्याच्‍या सीमा नलगोंडा, यदाद्रि भुवनगिरी, खम्मम, जनगांव, महबूबाबाद जिल्ह्यांसह आणि आंध्र प्रदेश राज्याला लागून आहेत.

पर्यटन

फणिगिरी

फणीगिरी हे एक बौद्ध स्थळ आहे जे नलगोंडा शहरापासून ८४ किमी अंतरावर आहे. तेलंगणाच्या पुरातत्त्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने या ठिकाणी उत्खनन केल्यानंतर हे ठिकाण नुकतेच सापडले आहे. फणिगिरीमध्ये एक मोठा स्तूप आणि दोन विशाल सभाग्रह आहेत ज्यामध्ये स्तूप देखील बांधले आहेत. जागेच्या आकारमानाचा विचार केल्यास असे समजू शकते की हे ठिकाण एक प्रमुख बौद्ध स्थळ राहिले असावे.

पिल्ललमर्री

पिल्ललमर्री हे सूर्यापेट जिल्ह्यांतर्गत येणारे एक छोटेसे गाव आहे. हे गाव काकतीय राजांनी बांधलेल्या अनेक मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. गावाच्या वैभवशाली भूतकाळाची ऐतिहासिक आठवण असलेल्या या सुंदर मंदिरांमुळे या गावाचे महत्त्व आहे.

पेद्दगट्टू जत्रा

पेद्दगट्टू किंवा गोल्लगट्टू जत्रा हा भगवान लिंगमंथुलु स्वामी आणि देवी चौदम्माच्या नावाने दर २ वर्षांनी केला जाणारा उत्सव आहे. प्रमुख देवता, श्री लिंगमंथुलु स्वामी, भगवान शिवाचा अवतार मानतात, आणि त्यांची बहीण - चौदम्मा, या पाच दिवसांच्या उत्सवादरम्यान विविध पूजा केल्या जातात.[२]

पिल्ललमर्री शिव मंदीर

लोकसंख्या

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार, सध्याच्या सूर्यापेट जिल्ह्याची लोकसंख्या १०,९९,५६० आहे, लिंग गुणोत्तर हे १००० पुरुषमागे ९९६ स्त्रिया आहेत. साक्षरता दर ६४.११% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या १५.५६% लोक शहरी भागात राहतात.

मंडळ (तहसील)

सूर्यापेट जिल्ह्या मध्ये २३ मंडळे आहेत: सूर्यापेट आणि कोदाड हे दोन महसुल विभाग आहेत.

हे देखील पहा

बाह्य दुवे

साचा:कॉमन्स वर्ग


संदर्भ

साचा:संदर्भयादी साचा:तेलंगणामधील जिल्हे