शिळ (रत्नागिरी)
साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र शिळ हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान संपादन
शिळ गाव रत्नागिरी शहरापासून १०किमी अंतरावर आहे
हवामान संपादन
पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.
लोकजीवन संपादन
प्रेक्षणीय स्थळे संपादन
ग्रामदेवता श्री देव रणवीर कालिका वाघजाई विठलादेवी मंदिर आहे तसेच श्री चंडकी देवी आणि श्री भराडीन देवीची दोन मंदिरे आहेत. या ग्रामदेवतेच्या मंदिरात शिमगोत्सव, जागरी पौर्णिमा, देव दिवाळी, नवरात्र, इ. उत्सव साजरे केले जातात. हे देवस्थान पुरातन असून नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे. येथील शिळ धरण प्रेक्षणीय स्थळ आहे. शिळ गावाच्या श्री देव रणवीर कालिका वाघजाई देवीचा शिमगोत्सव खूप प्रसिद्ध आहे.
नागरी सुविधा संपादन
येथे एसटी बस सेवा उपलब्ध आहे. तसेच अंगणवाडी, प्राथमिक शाळा आहे.
जवळपासची गावे संपादन
शिळ गावाच्या बाजूला मिरजोळे, मजगाव, फणसवळे, इ. गावे आहेत.
संदर्भ संपादन
१.https://villageinfo.in/ २.https://www.census2011.co.in/ ३.http://tourism.gov.in/ ४.https://www.incredibleindia.org/ ५.https://www.india.gov.in/topics/travel-tourism ६.https://www.mapsofindia.com/