Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शुंग साम्राज्य - मराठीपिडिया Jump to content

शुंग साम्राज्य

मराठीपिडिया कडून

साचा:इतिहासलेखन साचा:माहितीचौकट ऐतिहासिक साम्राज्य

शुंग कालखंडातील यक्षमूर्ती
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शुंग कालखंडातील ब्राँझचे नाणे

शुंग घराणे (इ.स.पू. १८५ ते इ.स.पू. ७३) याची स्थापना पुष्यमित्र याने इ.स.पू. १८५ मध्ये केली. या घराण्यात एकूण दहा राजे होऊन गेले. त्यांनी एकूण ११० वर्षे मगधावर सत्ता गाजवली.

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

शुंग घराण्याची स्थापना करणारा पुष्यमित्र हा मौर्य साम्राज्याचा शेवटचा राजा बृहद्रथ याच्या सैन्यात सेनापती होता. त्यावेळी मौर्य साम्राज्य दुर्बल झाले होते. या साम्राज्यातून कलिंग देश स्वतंत्र झाला होता. तशातच पुष्यमित्राने बृहद्रथाची हत्या करून मगधाचे राज्य मिळविले व शुंग घराण्याची स्थापना केली.

राज्यकर्ते[संपादन | स्रोत संपादित करा]

कामगिरी[संपादन | स्रोत संपादित करा]

पुष्यमित्राने छत्तीस वर्षे मगधावर राज्य केले. पुष्यमित्राची राजधानी पाटलीपुत्र येथे होती. इ.स.पू. १७५च्या सुमारास मिनँडर या ग्रीक राजाने हिंदुस्थानवर स्वारी केली होती. सिंध, काठेवाड व पश्चिम किनार्यावरील काही भाग त्याने जिंकला. मथुरा नगरी जिंकून तो पाटलीपुत्रावर चाल करून आला त्यावेळी पुष्यमित्राने त्याच्याशी लढाई करून त्याला हिंदुस्थानाबाहेर हाकलून लावले. पुष्यमित्राचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भावर स्वारी करून तो प्रांत शुंग घराण्याच्या अमलाखाली आणला. अग्निमित्रानंतर शुंग घराण्यातील महत्त्वाचा राजा म्हणजे भागभद्र होय. भागभद्रानंतर आलेला देवभूती यानेही काही फारसी चांगली कामगिरी केली नाही.

शेवट[संपादन | स्रोत संपादित करा]

देवभूतीच्या काळात वसुदेव हा त्याचा प्रधान होता. कण्व घराण्यातील या वसुदेवानेच देवभूतीला ठार केले व शुंग घराण्याचा शेवट होऊन मगधावर कण्व घराण्याची सत्ता स्थापन झाली.

हे ही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:भारतीय राजवंश