श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००५

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox cricket tour ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर २००५ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता. दौरा दोन भागात विभागला गेला होता कारण एकदिवसीय मालिका (२५ ऑक्टोबर ते १२ नोव्हेंबर) आणि डिसेंबरमधील कसोटी मालिकेदरम्यान दक्षिण आफ्रिकेचा संघ एकदिवसीय मालिकेसाठी भारतात आला होता. एकदिवसीय मालिकेआधी भारतीय संघ आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत सातव्या स्थानी होता, आणि श्रीलंकेचा संघ दुसऱ्या. त्याशिवाय भारतीय संघाचे नेतृत्व सौरव गांगुलीकडून औपचारिकरित्या राहुल द्रविडकडे देण्यात आले होते. भारतीय संघाने पहिले चार एकदिवसीय सामन्यांसह मालिकेत ६-१ असा विजय मिळवला. पहिल्या सहा एकदिवसीय सामन्यांत फक्त ८६ धावा करू शकलेल्या, सनत जयसुर्याला श्रीलंकेच्या कसोटी संघातून वगळण्यात आले.[१]. एकदिवसीय सामन्यांमध्ये २ वेळा नाबाद राहुन ३१२ धावा केल्या नंतर एकदिवसीय क्रमवारीत राहुल द्रविड १८ स्थाने वर चढला[२] भारताचा यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोणीची कामगिरीसुद्धा लक्षणीय झाली, मालिकेत त्याची सरासरी दुसरी सर्वात जास्त होती. एका सामन्यानत त्याने नाबाद १८३ धावा केल्या, जी त्यावेळी एकदिवसीय क्रिकेटमधील सहावी सर्वोच्च धावसंख्या होती.

कसोटी मालिकासुद्धा भारताने २-० अशी जिंकली, ज्यापैकी पहिल्या कसोटी मालिकेत पावसामुळे फक्त साडेतीन दिवसांचा खेळ शक्य झाला होता. दुसऱ्या कसोटीत अनिल कुंबळेने ७२ धावांत ६ गडी बाद केल्याने, भारताला ६० धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ४ फलंदाजांनी केलेल्या अर्धशतकांच्या (इरफान पठाण (९३), युवराज सिंग (७७), राहुल द्रविड (५३) आणि महेंद्रसिंग धोणी (५१*)) जोरावर भारताला ३७५ धावांवर डाव घोषित करता आला. त्यानंतर कुंबळेने सामन्यात १० बळी पूर्ण केले आणि श्रीलंकेचा संघ २४७ धावांवर बाद होऊन १८८ धावांनी पराभूत झाला. तिसऱ्या कसोटीतील विजय आणखी ठोस होता, कुंबळेने ७ आणि हरभजन सिंगने १० बळी घेऊन श्रीलंकेचा डाव २०६ आणि २४९ धावांवर संपवण्यास हातभार लावला आणि श्रीलंका २५९ धावांनी पराभूत झाली.

संघ

सहाव्या आणि सातव्या सामन्यात वेणुगोपाल राव आणि जयप्रकाश यादव यांच्याऐवजी मोहम्मद कैफ आणि विक्रम राज वीर सिंग यांची निवड करण्यात आली, परंतु सिंग क्षमता चाचणीत नापास झाल्याने यादवला पुन्हा निवडण्यात आले.[३]
चामर कपुगेडेराची कसोटी संघात निवड झाली होती परंतु दुखापतीमुळे मुबारकची संघात निवड करण्यात आली[४]
तिसऱ्या कसोटीमध्ये गांगुलीच्या ऐवजी वसिम जाफरची निवड करण्यात आली. [५]

दौरा सामने

५०-षटके: मुंबई क्रिकेट असोसिएशन अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

प्रथम श्रेणी: भारतीय अध्यक्षीय XI वि. श्रीलंकन्स

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

२रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

३रा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

४था एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

५वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

६वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

७वा एकदिवसीय सामना

साचा:माहितीचौकट मर्यादित षटकांचे सामने

कसोटी मालिका

१ली कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

२री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

३री कसोटी

साचा:माहितीचौकट कसोटी सामने

बाह्यदुवे

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २००५-०६ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे

  1. जयसुर्याला वगळले क्रिकइन्फो, २८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  2. श्रीलंकेचा भारत दौरा, २००५-०६ एकदिवसीय मालिकेचील सरासरी क्रिकइन्फो
  3. दुखापतग्रस्त विक्रम राज वीर सिंगऐवजी यादव पुन्हा संघात क्रिकइन्फो, ८ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  4. श्रीलंकाच्या संघात जेहान मुबारकची निवड क्रिकइन्फो, २९ नोव्हेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)
  5. गांगुलीला तिसर्‍या कसोटीतून वगळले क्रिकइन्फो, १४ डिसेंबर २००५. (इंग्रजी मजकूर)