सत्य युग

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

हिंदू धर्मातील कालगणनेनुसार काळ (वेळ, समय) हा चार भागांत अथवा युगांत विभागलेला आहे. त्यातील पहिला भाग म्हणजे कृतयुग किंवा सत्य युग.

युगाची कल्पना

वैश्विक संदर्भात काळ हा चक्राकार मानला गेलेला आहे. या चक्राकार काळाबद्दल दोन कल्पना मांडण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक म्हणजे महायुग कल्पना व दुसरी मन्वंतर कल्पना. महायुग कल्पनेत एका चक्राचा काळ हा ४३,२०,००० मानवी वर्षे इतका आहे. दुसऱ्या कल्पनेत चौदा मन्वंतरे येतात. प्रत्येक दोन मन्वंतरांमध्ये मोठे मध्यंतर असते. प्रत्येक मन्वंतराच्या शेवटी विश्वाची पुनर्निर्मिती होते आणि त्यावर एक मनू (आदिपुरुष) अधिराज्य करतो. सध्या आपण चौदांपैकी सातव्या मन्वंतरात आहोत. प्रत्येक मन्वंतरात ७१ महायुगे येतात. प्रत्येक महायुग हे चार युगात (कालखंडात) विभागले जाते. सध्याची ही चार युगे म्हणजे कृत, त्रेता, द्वापर आणि कली. या युगांत अनुक्रमे ४८००, ३६००, २४०० आणि १२०० वर्षे येतात. मानवी वर्षात त्यांची संख्या काढताना त्यांना प्रत्येकी ३६० ने गुणावे लागते. यापैकी आपण सध्या चौथ्या म्हणजे कलियुगात आहोत आणि या युगाचा प्रारंभ इ.स.पू. ३१०२ मध्ये झाला असे मानले जाते.[१]

वर्णन

कृतयुग किंवा सत्य युग हे युग स्वर्गासारखे होते. त्यात सर्व पक्षी-प्राणी, झाडे, फुले ,निसर्गरम्य होती. देव आणि प्रत्यक्ष श्रीविष्णूनारायण-श्रीलक्ष्मी ह्या युगात राहत होते.

जैन धर्म

जैन कालचक्र

ब्रह्माण्ड (जैन धर्म) मध्ये वर्णन केले आहे .अनंत वेळीचे चक्र दोन भागात विभाजित आहे.

  • उत्सर्पणि (प्रगतिशील चक्र).
  • अवसर्पणी (प्रतिगामी चक्र)

जैन कालचक्र

हे सहा आरांचे चक्र आहे.

सुखम-सुखम (खूप चांगले)

सुखम (चांगले )

सुखम-दुखम (चांगले वाईट)

दुखम-सुखम (वाईट चांगले ) - २४ तीर्थंकरांचे युग

दुखम (वाईट) - आजचे युग

दुखम-दुखम (खूप वाईट)[२][३]

हे पण पहा

सात्त्विक आहार

श्रीलक्ष्मीनारायण

कल्की आवतार

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:विस्तार साचा:चार युगे

साचा:हिंदू धर्म