कल्की अवतार

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट हिंदू देवता कल्की अवतार (संस्कृत: कल्कि अवतार;IAST: Kalkī Āvatār ) हा हिंदु धर्मातील देवता विष्णूचा दशावतारापैकी १० वा अवतार आणि भविष्यातील अवतार मानला जातो. वैष्णव ब्रह्मांडशास्त्रानुसार, हा अंतहीन चक्र असलेल्या चार कालखंडापैकी शेवटचा असून कलियुगाच्या अंतानंतर येणारा हिंदू देव विष्णूचा दहावा अवतार आहे. जेव्हा कल्की देवदत्त नावाचा शुभ्र घोड्यावर स्वार होऊन, तेजस्वी तलवारांनी सर्व पापी अधर्म दुष्ट लोकांचा विनाश करेल तेव्हा सतयुग प्रारंभ होईल.[१] पौराणिक कथांनुसार, कलियुगात पाप वाढल्यावर, जगातील अंधार व अधर्म, दुष्टांचा नाश करण्यासाठी, धर्म स्थापना करण्यासाठी कल्की अवतार प्रकट होईल. कलियुगाकलि राक्षसाचा विनाश करेल.  [२][३] कल्की अवताराला "निष्कलंक भगवान "या नावाने देखील ओळखला जाईल.[४] हा अवतार ६४ कलांनी पूर्ण असलेला 'निष्कलंक अवतार' आहे.[१]

कल्की हा अवतार कलियुग व सतयुगच्या संधिकालामध्ये होईल[५][६];सर्वप्रथम महाप्रलय [७] येऊन कलियुगाच्या अंतानंतर सत्ययुग (सतयुग) सुरू होईल [८]

कलियुगाचा कालावधी ४,३२,००० वर्षे आहे, विद्वानांच्या संशोधनानुसार, इसवी सन पू्र्व ३,१०२ या वर्षी कलियुग सुरू झाले.[८]

त्याच्या पौराणिक कथांची तुलना इतर धर्मातील मशीहा,कयामत, फ्रैशोकरेटी(फारशी) आणि मैत्रेय ,संकल्पनेशी केली आहे.[१][९]

व्युत्पत्तिशास्त्र

कल्कि हे नाव (अनंतकाळ) आधारित आहे, ज्याचा अर्थ "वेळ" (कलियुग) आहे. कल्कीचा शाब्दिक अर्थ "सशक्त आवाज" आहे. महाभारत हस्तलिखिते (उदा. G३.६ हस्तलिखित) सापडली आहेत, जिथे संस्कृत श्लोकांमध्ये "कल्की" ऐवजी अवताराचे नाव "कार्की" असे आहे.[१०] कल्की , ज्याला कल्किन किंवा कार्की देखील म्हटले जाते.

"कल्की" संस्कृतमध्ये कमळांचे फूल जसे " चिखलामधून-उत्पत्ति " असेही वर्णन केले आहे .

दुसरे अर्थ अंधाराचा नाश, कल्मषनाशक[११](पापनष्ट ) घाण विनाश करणारा, कल्की (संस्कृत कलकी, संस्कृत ; कल्किन् पासून ) ज्याचा अर्थ दुः ख व अंधाराचा नाश करणारा' किंवा 'अज्ञानाचा नाश करणारा' . संस्कृतमधील आणखी एक व्युत्पत्तिशास्त्र म्हणजे 'पांढरा घोडा'.[१२]

कल्की अवतार (देवनागरी : कल्कि अर्थ; 'अनंतकाळ,' 'पांढरा घोडा' किंवा 'घाण विनाश करणारा')कोणास हे माहीत नाही की कल्कि अवतार हा कोणी मनुष्य नसून पांढरा घोडा देवदत्त हाच कल्कि अवतार आहे !कारण संस्कृतमध्ये कल्कि शब्दाचा अर्थ घोडा असा होतो .

पौराणिक कथा आणि ग्रंथ

कल्की पुराण हिंदूं धर्मातील विविध धार्मिक आणि पौराणिक ग्रंथांमधील एक उपपुराण आहे.

कल्की पुराण २.७ अनुसार सिंहलदेशाधिपती बृहद्रथ राजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची कन्या पद्मा (लक्ष्मी) हिच्याशी कल्कीचा विवाह होईल.[३] कीकट देशातील ‘शंभल’ नावाच्या ग्रामात विष्णूयश नावाच्या ब्राह्मणाचा पुत्र म्हणून हा जन्म घेईल. गोत्र पराशर असेल.याज्ञवल्क्यजी पुजारी असतील आणि भगवान परशुराम[१३] कल्कीचे गुरू असतील. कल्किपुराणादिकांतून केले आहे. कल्कीला ‘कलंकी’ असेही म्हणतात.  [१४]

शीख धर्मात शिख धर्म-गुरू गोविंदसिंह यांनी रचना केली. चोवीस अवतार हा दशमग्रंथांचा एक भाग आहे .दशमग्रंथांमध्ये विष्णूच्या चोवीस अवतारांचे[१५] वर्णन केले आहे.[१६] विष्णूचा २४ व्या अवतार Nihakalanki (निहाकलंकी) [३] वा (निष्कलंकी ) अवतार उल्लेख आढळते.

कल्की अवतार गरुड[१७], विष्णू पुराणात दहाव्या क्रमांकावर उल्लेख आढळते. विष्णू पुराण, मत्स्य पुराण, आणि भागवत पुराण यासारख्या महा पुराणात कल्कि अवताराचे उल्लेख सुद्धा आढळते.[३]

मुघल आक्रमण आणि विध्वंस

संभल अथवा शंभल तहसील उत्तर प्रदेश येथील रहिवाशांचा असा विश्वास आहे की पौराणिक संभल हेच ते ठिकाण आहे जेथे, कलियुगमध्ये, भगवान विष्णू कल्की अवतारात पुनर्जन्म घेतील. आक्रमक क्रूर मुघल मीर हिंदू बेग याने येथील हरिहर मंदिर पाडले. इ.स. १५२८ मध्ये त्याने त्या जागेवर याच मंदिराचे साहित्य वापरून संभल मशीद बांधली. मीर ने येथे हिंदूंचा छळ केला त्यांना मारून टाकले गेले होते. आता हे मंदिर परत उभारणीसाठी हिंदू लढा देत आहेत.

भागवत पुराण

भागवत पुराणात कल्की अवतार २२ व्या [१८][१९] अवतारात उल्लेख आढळते .[२०]

भागवत पुराणात वैकल्पिक यादी देखील देण्यात आली आहे, ज्यात त्या अध्याय १.३ मध्ये २२ विष्णू अवतारांची संख्यात्मक यादी केली आहे.

  1. सनकादि[२१][भागवत पु.१.३.६] -ब्रह्मदेवाचे चार मानस पुत्र आणि भक्ती मार्गाचे उदाहरण दिले.[२०]
  2. वराह [भागवत पु.१.३.७] - विष्णूच्या दशावतारांपैकी तिसरा अवतार [२२] हिरण्याक्ष राक्षसाचा वध करणारा
  3. नारद [भागवत पु.१.३.८] -नारद मुनी हे ब्रह्म देवांच्या सात मानस पुत्रांपैकी एक. नारद मुनी हे भगवान विष्णू यांच्या परमप्रिय भक्तांपैकी एक मानले जातात.[२३]
  4. नर-नारायण [भागवत पु.१.३.९] - हिंदू जुळे संत आहे. नर-नारायण हे पृथ्वीवरील विष्णूचे जुळ्या अवतार आहेत.[२४]
  5. कपिल [भागवत पु.१.३.१०] -महाभारतात कर्दम ऋषि आणि देवहूति यांचा मुलगा.[२०]
  6. दत्तात्रेय [भागवत पु.१.३.११] - विष्णू, ब्रह्माशिव यांचे अवतार मानले जातात.अत्रि ऋषी व पत्नी अनसूया यांचा पुत्र.
  7. यज्ञ (सुयज्ञ) [भागवत पु.१.३.१२] -अग्नी-यज्ञाचा स्वामी जो वैदिक इंद्र - स्वर्गाचा स्वामी देखील होता.[२०]
  8. ऋषभदेव [भागवत पु.१.३.१३] -भरत चक्रवर्तीन आणि बाहुबली यांचे पिता.[२०]
  9. पृथु [भागवत पु.१.३.१४] - राजा पृथू हा राजा वेन यांचा मुलगा होता.[२५]
  10. मत्स्य [भागवत पु.१.३.१५] -विष्णूच्या दशावतारांपैकी पहिला अवतार.हिंदू पौराणिक कथानुसार प्रलयच्या वेळी मनुला वाचवले आणि हयाग्रीवा असुर या नावाचा राक्षसाचा वध करणारा.[२०][२६]
  11. कूर्म [भागवत पु.१.३.१६] - श्रीविष्णूच्या दशावतारांपैकी दुसरा अवतार,हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी .मंदारचल पर्वताला सागराच्या तळाशी आधार दिला.
  12. धन्वंतरी [भागवत पु.१.३.१७] - पौराणिक कथानुसार देव-दानव सागरमंथन करत होते तेव्हा चौदा रत्न निघाले. त्यांपैकी एक म्हणजे विष्णू अवतार देव धन्व॔तरी होय. आयुर्वेदिक औषधाचे जनक आणि देवाचे चिकित्सक.
  13. मोहिनी [भागवत पु.१.३.१७] -हिंदू पौराणिक कथानुसार समुद्रमंथनाचावेळी विष्णूने धारण केलेले अवतार.
  14. नरसिंह [भागवत पु.१.३.१८] - पौराणिक कथानुसार विष्णूच्या दशावतारांपैकी चौथा अवतार,हिरण्यकशिपु राक्षसाचा वध करणारा मनुष्य-सिंह.[२०]
  15. वामन [भागवत पु.१.३.१९] - विष्णूच्या दशावतारांपैकी पाचवा अवतार .महर्षी कश्यप आणि अदिती यांचा पुत्र
  16. परशुराम [भागवत पु.१.३.२०] - भगवान विष्णूंचा सहावा अवतार .कार्तवीर्य अर्जुनाचा(सहस्रार्जुन ) वध करणारा.
  17. वेदव्यास [भागवत पु.१.३.२१] - पराशर ऋषींचे पुत्र महर्षी वेदव्यास (पाराशर व्यास ) यांनी महाभारत या महाकाव्याची रचना केली.[२७]
  18. राम [भागवत पु.१.३.२२] - वाल्मीकिंनी रचलेल्या ’रामायण’ या महाकाव्याचे नायक आहेत. श्रीराम हे भगवान विष्णू यांचे सातवा अवतार
  19. बलराम [भागवत पु.१.३.२३] - श्रीकृष्णाचा मोठा भाऊ आहे.अनंत शेष नागाचा अवतार[२८]
  20. कृष्ण [भागवत पु.१.३.२३] - विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. देवकी आणि वसुदेवाचा पुत्र
  21. बुद्ध [भागवत पु.१.३.२४] -हिंदू अनुयायी गौतम बुद्धांना विष्णूचा नववा अवतार असे मानतात[२९]
  22. कल्की [भागवत पु.१.३.२६] -हिंदू पौराणिक देवता विष्णूचा दहावा अवतार आहे. कलियुगाकलि राक्षसाचा विनाश करेल.

हयग्रीव, हंस आणि गरुड सारख्या अवतारांचा उल्लेखही पंचरात्रमध्ये एकूण एकोणतीस अवतार आहे. तथापि, या याद्या असूनही, साधारणतः विष्णूसाठी स्वीकारलेल्या दहा अवतारांची संख्या १० व्या शतकापूर्वी निश्चित केली गेली होती.[२०]


कल्की पुराण [१]

इयं मम प्रिया लक्ष्मीः सिंहले संभविष्यति

बृहद्रथस्य भूपस्य कौमुद्यां कमलेक्षणा

भार्यायां मम भार्यैषा पद्मानाम्नी जनिष्यति -कल्कि पुराण:२.६[३०]

अर्थ :- कल्कि पुराणानुसार, कमळासारखी सामान डोळे असणारी माझी प्रिया लक्ष्मी (देवी) पृथ्वीवर सिंहल या बेटांचा बृहद्रथराजा आणि त्यांची पत्नि कौमुदी यांची पुत्री देवी लक्ष्मी अवतरित होईल .[३१]

कल्की अवताराचा जन्म

श्रीमद् भागवतनुसार(भागवत पुराण) कलियुगात पाप वाढल्यावार आणि पापाने परिसीमा गाठल्यावर दुष्टांचा संहार करण्याकारिता विष्णू हा अवतार घेईल;

शम्भल ग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः।

भवने विष्णूयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति॥[३०] -श्री भागवत महा पुराण – १२:२:१८[३१]

अर्थ :- शंभल नावाच्या गावातील विष्णूयश नावाचा एक श्रेष्ठ ब्राह्मण होईल, त्याचे हृदय खूप दयाळू आणि भागवत भक्तीने परिपूर्ण असेल, यांचा घरात कल्की अवतरित होईल.[३२]

द्वादश्यां शुक्ल-पक्षस्य माधवे मासि माधवम्

जातं ददृशतुः पुत्रं पितरौ हृष्ट-मानसौ - कल्कि पुराण: २.१५[३३]

श्रीमद् भागवत (भागवत पुराण) श्रीमद् भागवत पुराण १ स्कन्धः ३ अध्यायः[३४]

अथासौ युगसंध्यायां दस्युप्रायेषु राजसु ।

जनिता विष्णूयशसो नाम्ना कल्किर्जगत्पतिः ॥ २५ ॥

अथ - नंतर - असौ - हा - जगत्पतिः - जगांचा पालनकर्ता - युगसंध्यायां - युगाच्या संधिकाळी - राजसु - राजे - दस्युप्रायेषु - बहुतेक चोरासारखे झाले असता - विष्णूयशसः - विष्णूयशापासून - कल्किः - कल्कि - नाम्ना - नावाने - जनिता - उत्पन्न होईल. ॥२५॥

अर्थ - यापुढे जेव्हा कलियुग समाप्त होण्याचा काळ येईल आणि राजेलोक लुटारूसारखे बनतील, तेव्हा जगाचे रक्षण करण्यासाठी भगवान विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या घरी कल्किरूपाने अवतार घेतील. (वरील बावीस अवतारांखेरीज हंस आणि हयग्रीव हे दोन अवतार धरून चोवीस अवतार होतात.) (२५)

श्रीमद् भागवत पुराण स्कन्द बारावा द्वितीयोऽध्यायः

श्रीशुक उवाच

  • ततश्चानुदिनं धर्मः सत्यं शौचं क्षमा दया ।

कालेन बलिना राजन् नङ्‌क्ष्यत्यायुर्बलं स्मृतिः ॥ १ ॥

अर्थ - श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! बलवान काळाच्या प्रभावाने उत्तरोत्तर धर्म, सत्य, पवित्रता, क्षमा, दया, आयुष्य, बळ आणि स्मरणशक्ती यांचा लोप होत जाईल. (१)

  • अनाढ्यतैव असाधुत्वे साधुत्वे दंभ एव तु । स्वीकार एव चोद्वाहे स्नानमेव प्रसाधनम् ॥ ५ ॥ अर्थ - गरिबी हेच दुर्जनत्त्वाचे लक्षण असेल. आणि दांभिकपणा हेच साधुत्वाचे लक्षण असेल. एकमेकांची पसंती हाच विवाहसंस्कार असेल आणि प्रसाधनालाच स्नान समजले जाईल. (५)
  • दाक्ष्यं कुटुंबभरणं यशोऽर्थे धर्मसेवनम् ।

एवं प्रजाभिर्दुष्टाभिः आकीर्णे क्षितिमण्डले ॥ ७ ॥

ब्रह्मविट्क्षत्रशूद्राणां यो बली भविता नृपः ।

प्रजा ही लुब्धै राजन्यैः निर्घृणैः दस्युधर्मभिः ॥ ८ ॥

आच्छिन्नदारद्रविणा यास्यन्ति गिरिकाननम् ।

शाकमूलामिषक्षौद्र फलपुष्पाष्टिभोजनाः ॥ ९

अर्थ - कुटुंबाचे पालन-पोषण हे चातुर्य समजले जाईल. कीर्ती मिळविण्यासाठी धर्माचरण केले जाईल. अशा प्रकारे पृथ्वी जेव्हा अशा दुष्टांनी भरून जाईल, तेव्हा ब्राह्मण, क्षत्रिय , वैश्य आणि शूद्र यांपैकी जो बलाढ्य असेल, तोच राजा होईल. त्या काळात लुटारूसारखे लोभी व क्रूर राजे प्रजेचे धन व बायका पळवतील. त्यांना भिऊन प्रजा डोंगर-दऱ्यात किंवा जंगलात पळून जाईल. त्यावेळी प्रजा भाजीपाला , कंदमुळे, मांस, मध, फळे-फुले आणि बिया इत्यादी खाऊन आपले पोट भरेल. (७-९)[३५]

अनावृष्ट्या विनङ्‌क्ष्यन्ति दुर्भिक्षकरपीडिताः

शीतवातातपप्रावृड् हिमैरन्योन्यतः प्रजाः ॥ १० ॥

करची अक्र वाढेल दुष्काळ पडतील ते ।

अर्थ - कधी कोरडा दुष्काळ पडेल तर कधी कर लादले जातील. कधी कडक थंडी पडेल तर कधी हिमवर्षाव होईल. कधी तुफान होईल, कधी उष्णता वाढेल, तर कधी पूर येतील. या उत्पातांनी आणि आपापसातील संघर्षाने प्रजेला अतिशय त्रास होईल आणि ती नष्ट होईल. (१०)

क्षुत्तृड्भ्यां व्याधिभिश्चैव संतप्स्यन्तेच चिन्तया ।

त्रिंशद्विंशति वर्षाणि परमायुः कलौ नृणाम् ॥ ११ ॥

अर्थ -लोक तहान-भूक, रोग व अनेक प्रकारच्या चिंतांनी दुःखी होतील. कलियुगामध्ये माणसाचे जास्तीत जास्त आयुष्य वीस किंवा तीस वर्षे असेल. (११)

श्रीमद्भागवतपुराणम् /स्कन्धः १२/ अध्यायः२[३६][३७]

इत्थं कलौ गतप्राये जनेतु खरधर्मिणि । धर्मत्राणाय सत्त्वेन भगवान् अवतरिष्यति ॥ १६ ॥

मराठीत अर्थ:- अशा रीतीने कलियुगाच्या शेवटी माणसे गाढवासारखी होतील, तेव्हा धर्माचे रक्षण करण्यासाठी भगवान स्वतः सत्त्वगुणाचा स्वीकार करून अवतार धारण करतील.

चराचर गुरोर्विष्णोः ईश्वरस्याखिलात्मनः । धर्मत्राणाय साधूनां जन्म कर्मापनुत्तये ॥ १७ ॥

मराठीत अर्थ:-"सर्वशक्तिमान भगवान विष्णू सर्वव्यापी . सर्वस्वरूप, चराचराचे गुरू भगवान विष्णू धर्माचे रक्षण करण्यासाठी व साधूंना कर्मबंधनातून सोडविण्यासाठी अवतार घेतात.

संभलग्राम मुख्यस्य ब्राह्मणस्य महात्मनः । भवने विष्णूयशसः कल्किः प्रादुर्भविष्यति ॥ १८ ॥

मराठीत अर्थ:-विष्णू कल्कि हा शम्भल नावाच्या गावात विष्णूयश नावाच्या मुख्य महात्मा ब्राह्मणाच्या घरात पत्नी सुमतीच्या गर्भात भविष्यात जन्म घेईल.

अश्वं आशुगमारुह्य देवदत्तं जगत्पतिः । असिनासाधुदमनं अष्टैश्वर्य गुणान्वितः ॥ १९ ॥

मराठीत अर्थ:- अष्टमहासिद्धींना संपन्न आणि सद्गुणांचे आश्रय, चराचर जगताचे स्वामी भगवान, देवदत्त नावाच्या वेगवान घोड्यावर स्वार होऊन तलवारीने दुष्टांचा विनाश करतील.

विचरन् आशुना क्षौण्यां हयेनाप्रतिमद्युतिः । नृपलिङ्‌गच्छदो दस्यून् कोटिशो निहनिष्यति ॥ २० ॥

मराठीत अर्थ:- अतुलनीय तेज असणारे ते वेगवान घोड्यावरून पृथ्वीवरून संचार करतील आणि राजे म्हणवणाऱ्या कोट्यावधी डाकूंचा संहार करतील.

अथ तेषां भविष्यन्ति मनांसि विशदानि वै । वासुदेवाङ्‌गरागाति पुण्यगंधानिलस्पृशाम् ।पौरजानपदानां वै हतेष्वखिलदस्युषु ॥ २१ ॥

मराठीत अर्थ:-जेव्हा सर्व दुष्टांचा संहार होईल, तेव्हा नगरातील आणि गावातील लोकांची मने भगवान कल्कींच्या शरीराला लावलेल्या उटीच्या अत्यंत पवित्र सुगंधी वायूच्या स्पर्शाने पवित्र होतील

तेषां प्रजाविसर्गश्च स्थविष्ठः संभविष्यति । वासुदेवे भगवति सत्त्वमूर्तौ हृदि स्थिते ॥ २२ ॥

मराठीत अर्थ:-त्यांच्या हॄदयामध्ये सत्त्वमूर्ती भगवान वासुदेव विराजमान होतील. त्यामुळे त्यांची जनसमूह बलवान होऊ लागेल.

यदावतीर्णो भगवान् कल्किर्धर्मपतिर्हरिः । कृतं भविष्यति तदा प्रजासूतिश्च सात्त्विकी ॥ २३ ॥

मराठीत अर्थ:-धर्माचे रक्षण करणारे भगवान जेव्हा कल्कीच्या रूपाने अवतार घेतील, तेव्हा सत्ययुगाची सुरुवात होईल आणि नवी जनसमूह सात्त्विक होईल.

यदा चन्द्रश्च सूर्यश्च तथा तिष्यबृहस्पती । एकराशौ समेष्यन्ति भविष्यति तदा कृतम् ॥ २४ ॥

मराठीत अर्थ:- बृहस्पतीच्या तिष्य (पुष्य ) नक्षत्रात चंद्र, सूर्य आणि बृहस्पति एकाच नक्षत्रावर समान अंशात येतील,तेव्हा भविष्यात सत्ययुग सुरू होईल.


कलियुगाच्या समाप्तीपूर्वी
  1. कलियुगाच्या समाप्तीपूर्वी लोक फक्त मासे खाऊन बकरीचे दूध पिऊन जगतील कारण पृथ्वीवर एकही गाय राहणार नाही. हवामानाची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणाबाहेर जाईल. अति थंड, उष्णता आणि बर्फ तापमान खराब होण्यास कारणीभूत ठरेल. यामुळे, मानवी जीवन तहान, भूक आणि रोगांनी ग्रस्त असेल. कलियुगात, एखाद्या व्यक्तीचे वय केवळ ५० वर्षे असेल आणि ते आपल्या वृद्धांना संरक्षण देऊ शकणार नाहीत किंवा त्यांची काळजी घेऊ शकणार नाहीत.पृथ्वीवर कोणतीही व्यक्तीला वैदिक आणि धार्मिक कार्यात छंद नाही[३८]
  2. कलियुगाच्या शेवटी, फक्त तीव्र वादळ व भूकंप होतील. लोक घरांत राहणार नाहीत. लोक खड्डा खणतील. पृथ्वीचे तीन फूट म्हणजेच सुमारे साडेचार फूट पृथ्वीवरील सुपीक भाग नष्ट होईल.[८]
  3. ब्रह्मवैवर्त पुराणानुसार कलियुगात अशीही वेळ येईल जेव्हा मनुष्याचे वय खूपच कमी असेल, युवावस्था संपेल. कलीच्या प्रभावामुळे, प्राण्यांचे शरीर लहान, क्षीण आणि आजार होण्यास सुरुवात होईल.[३९][४०]
  4. पद्म पुराणात (६.७१.२७९.२८२) असे म्हटले आहे की भगवान कल्कि कलीचे युग संपवतील आणि सर्व दुष्ट म्लेच्छाचा[४१] विनाश करतील आणि अशा प्रकारे जगाची वाईट स्थिती नष्ट करतील. कलियुगात कल्कि नारायण हातात नंदक तलवार घेऊन तेजस्वी शुभ्र घोड्यावर स्वार होऊन प्रकट होईल.कलिचा (राक्षसाचा) विनाश करून सत्ययुग (सतयुग) सुरुवात होईल.[४२]

मंदिर

जयपूरमध्ये हवा महालासमोर कल्की अवताराचे एक प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर 18 वे शतक [४३] सवाई जयसिंह II(दुसरा) यांनी बांधले होते. या मंदिरात देव कल्कि यांच्यासह त्यांच्या घोड्याचा पुतळादेखील बसविला आहे.[४४]

कल्कि विष्णू मंदिर ';- उत्तर प्रदेशात संभल नावाच्या जिल्हात भगवान कल्कीचे मंदिर आहे.[४५]

धर्मग्रंथामध्ये वर्णन[४६]

हज़रत इमाम महदी:- अहमदिया (Ahmadiyya) हा एक इस्लामच्या सुन्नी पंथाचा उपसंप्रदाय आहे.- अहमदिया मुसलमान लोक हज़रत इमाम महदीला भविष्यात येणारा ईश्वर मानतात,

येशू मसीह- बायबल [४७] ख्रिश्चन धर्मग्रंथामध्ये प्रकटीकरण १९:११-१६ मध्ये ( ख्रिस्त ऑन व्हाईट हॉर्स ; Christ on a White Horse) असे वर्णन केले[६]

मैत्रेय बुद्ध -बौद्ध मान्यतेनुसार भविष्यकाळातील बुद्ध आहे.[४८]

बुद्ध बौद्ध ग्रंथ कालचक्रात कल्कीन वा चक्रीन [३] असे नाव आढळते. तिब्बती बौद्ध धर्मात, कालचक्र-तंत्रात[४९] २५ शासकांचे वर्णन केले गेले आहे, कल्की नावाचा आहे जो स्वर्गीय शंभल येथून राज्य करतो.असे वर्णन केले [३]

दावेदार

काही लोकांच्या मते हा अवतार पृथ्वीवर आला आहे.कल्कि अवतारच्या या पोस्टमध्ये अनेक स्वयंसेवी दावेदार आहेत, ज्यांना वेळोवेळी, भविष्यवाणीनुसार आणि स्वतः (लोक) कल्की संबंधित पुरावे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असलेल्या कल्कि अवतारच्या संदर्भात अनेक भविष्यवाण्यांविषयी (google.com, youtube.com इत्यादी) .(KALKI AVATAR) मध्ये शोधून पाहिले जाऊ शकते

काही जण शम्भलला चीनच्या गोबी वाळवंटात मानतात, जेथे मानव पोहोचू शकत नाहीत. काही वृंदावनमध्ये विश्वास करतात.

  • शम्भल [५०] तिबेटी बौद्ध परंपरेत, शम्भल (संस्कृत : शम्भलः ; तिब्बती भाषा : བདེ་འབྱུང, Wylie: bde 'byung; चीनी भाषा : 香巴拉; फिनयीन : xiāngbālā) हे एक पौराणिक शहर आहे.

हे शहर ८४ कमलदले असलेल्या कमळासारखे आणि बर्फाच्छादित पर्वतांनी घसरलेले आहे. त्याच्या मध्यभागी शंभल राजाचा महल आहे. काही ग्रंथांमध्ये शंभलला शांग्री-ला असे म्हणतात.तसेच कल्की अवतार हा भारतातच जन्मास येईल. अशाप्रकारचे वर्णन " कल्कि चालीसा "मध्ये आलेले आहे . शंबला या नावाची नगरी ही भारतात अनेक ठिकाणी आहे . उडीसामध्ये ती संबळपूर या नावाने ओळखली जाते . काही लोक तर असे मानतात की ही नगरी हिमालयात आहे. तर काही जण मानतात की ही नगरी प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही .

साचा:विस्तार

संदर्भ यादी

  1. १.० १.१ १.२ १.३ साचा:जर्नल स्रोत
  2. साचा:संकेतस्थळ स्रोत
  3. ३.० ३.१ ३.२ ३.३ ३.४ ३.५ साचा:जर्नल स्रोत
  4. साचा:संकेतस्थळ स्रोत
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. ६.० ६.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. ८.० ८.१ ८.२ साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:जर्नल स्रोत
  10. साचा:जर्नल स्रोत
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. साचा:संकेतस्थळ स्रोत
  13. साचा:संकेतस्थळ स्रोत
  14. साचा:संकेतस्थळ स्रोत
  15. साचा:जर्नल स्रोत
  16. साचा:संकेतस्थळ स्रोत
  17. साचा:संकेतस्थळ स्रोत
  18. साचा:संकेतस्थळ स्रोत
  19. साचा:संकेतस्थळ स्रोत
  20. २०.० २०.१ २०.२ २०.३ २०.४ २०.५ २०.६ २०.७ साचा:जर्नल स्रोत
  21. साचा:जर्नल स्रोत
  22. साचा:जर्नल स्रोत
  23. साचा:जर्नल स्रोत
  24. साचा:जर्नल स्रोत
  25. साचा:जर्नल स्रोत
  26. साचा:संकेतस्थळ स्रोत
  27. साचा:जर्नल स्रोत
  28. साचा:संकेतस्थळ स्रोत
  29. साचा:जर्नल स्रोत
  30. ३०.० ३०.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. ३१.० ३१.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  32. साचा:संकेतस्थळ स्रोत
  33. साचा:संकेतस्थळ स्रोत
  34. साचा:संकेतस्थळ स्रोत
  35. साचा:संकेतस्थळ स्रोत
  36. साचा:संकेतस्थळ स्रोत
  37. साचा:संकेतस्थळ स्रोत
  38. साचा:संकेतस्थळ स्रोत
  39. साचा:संकेतस्थळ स्रोत
  40. साचा:संकेतस्थळ स्रोत
  41. साचा:जर्नल स्रोत
  42. साचा:संकेतस्थळ स्रोत
  43. साचा:जर्नल स्रोत
  44. साचा:संकेतस्थळ स्रोत
  45. साचा:संकेतस्थळ स्रोत
  46. साचा:स्रोत पुस्तक
  47. साचा:संकेतस्थळ स्रोत
  48. साचा:जर्नल स्रोत
  49. साचा:स्रोत पुस्तक
  50. साचा:जर्नल स्रोत

[१][२]

साचा:दशावतार