कलि (राक्षस)

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट हिंदू देवतासाचा:बदल इंग्रजीत kali goddess किंवा कलिका याच्याशी गल्लत करू नका.

कलि (राक्षस) (Devanāgari: कलि राक्षस, IAST: kali rākṣasa) हिंदु धर्मातील चार युगापैकी एक युग म्ह्णजे कलियुग या युगातील दुष्टांच्या स्रोत आहे. आणि श्रीविष्णूचा दशावतारपैकी अंतिम महाअवतार श्रीकल्की अवतारचे परमशत्रु आहे.

कल्की पुराणात, तो एका नश्वर राक्षसाच्या रुपात दर्शविला गेला आहे.आणि तो सर्व वाईट गोष्टींचा उगम आहे. [१]

कलियुगात धर्म एकपाद व अधर्म चतुष्पाद असतो म्हणून या युगात लोकांची प्रवृत्ती अधर्माकडे अधिक असते. त्रिगुणांतील तमोगुण हा या युगाचा प्रमुख गुण असतो, असे पुराणांत म्हटले आहे. धर्मशास्त्रात कलिवर्ज्य म्हणून अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. विष्णूचाकल्की अवतार होईल तेव्हा हे कलियुग संपून परत कृतयुगास (सत्ययुग) प्रारंभ होईल, असे भागवतपुराणात म्हटले आहे. [२]

पुराणानुसार ,कलि राक्षसाला २ पत्नी दुरुक्ति(पहिली पत्नी व बहिण) ,अलक्ष्मी ज्येष्ठा देवी(दुसरी पत्नी )[३] ही श्रीलक्ष्मीची मोठी बहीण आहे[४] [५]

पौराणिक कथा

पुराणांत एक युगवाचक व्यक्ती म्हणूनही कलीचे वर्णन आढळते. क्रोध व हिंसा यांचा कली हा पुत्र असून भय व मृत्यू ही त्याची अपत्ये होत. परीक्षित राजाने कलीचा पराभव करून मद्य, द्यूत, सुवर्ण, स्त्रिया व हत्त्या ही पाच निवासक्षेत्रे त्याला दिली. नल राजाच्या शरीरात कलीने प्रवेश केला होता इ. पौराणिक कथा आहेत.[६]

महाभारतामध्ये तो गंधर्व होता. महाभारतात त्याने सारीपाटाच्या खेळात पांडव आणि कौरव यांच्यात युद्धाची निर्मिती केली.[७]

कल्कीपुराणानुसार कोक-विकोक कलि राक्षसाचे जुळे बंधु आहे.युद्धामध्ये श्रीकल्की अवताराला मारणासाठी कलिला सहाय्य करतात. श्रीकल्की अवतार कोक-विकोक दानवांचा वध करतील.[८][९]

धर्माग्रंथामध्ये वर्णन[१०]

नरक दानव (सैतान्)

सर्व धर्मातील राक्षसाची नावे खाली दिलेले आहे

झोरास्तरीयन पारशी (जरथुश्त्र )-अंग्रो-मइन्यु ( Angra Mainyu)[११]: पारशी धर्मग्रंथात वर्णन केलेल्या पाशवी प्रवृत्तीचे मूर्तस्वरूप म्हणजे अंग्रो-मइन्यु होय. पेहलवी भाषेत त्यास ‘अहरिमनAhriman अशी संज्ञा आहे. जरथुश्त्रप्रणीत गाथेत  अंग्रो- मइन्यूचा उल्लेख आढळत नाही तथापि अन्य अवेस्ता प्रकरणांत हे नाव येते. स्पॅंता-मइन्यु (अहुर मज्द) ह्या दैवी प्रवृत्तीचा त्यास शत्रू मानले आहे. तो साक्षात मृत्युस्वरूपी असून जीवसृष्टीत निर्माण होणारे रोग व तदनुषंगिक घाण, सडणे कुजणे इ. प्रक्रिया घडवून आणतो. अवेस्ता साहित्यात आढळतो. सैतानाशी त्याचे बरेच साम्य आहे.[१२]

बौद्ध :- मार (राक्षस)

ख्रिश्चन: - सैतान,देविल. (ल्यूसिफर Lucifer)

इस्लाम:- जल्लाद वा दज्जाल[१३][१४]

हे पण पहा

मार (राक्षस)

शैतान

Al-Masih ad-Dajjal [१५]

श्रीकल्कि आवतार

संदर्भ यादी