Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385 अलक्ष्मी - मराठीपिडियाJump to content
साचा:माहितीचौकट हिंदू दैवतअलक्ष्मी (संस्कृत: अलक्ष्मी, IAST: alakṣmī , इंग्रजी- Goddess of misfortune, bad luck ) ही हिन्दू धर्मात दुर्भाग्याची देवी आहे .[१]अशुभ, पाप, दारिद्ऱ्य, वेदना, क्लेश, धार, विनाश, अधर्माची देवता असल्याचे म्हटले जाते. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत. गाढव हे तिचे वाहन असते.
पद्मपुराणात , ऋग्वेदात निर्ऋती[२] देवी नाव आढळते, ती (अष्ट-दिक्पाल)आठ दिशामधील नैर्ऋत्य दिशेची देवता.[३]
मुखेड येथील महादेव मंदिरावरील हातात झाडू, व वाहन गाढव असलेली मूर्ती अलक्ष्मी असल्याचे काहींनी मांडले आहे. पण ती दिगंबर मूर्ती अलक्ष्मीची नाहीतर शीतलामाता देवीची आहे..केरसुणी, गाढव आहेच पण कपाल, नरमुंड आणि वेताळपण आहे..अन्य लक्षणेही शीतलामातेची आहेत.. शीतला मातेने ज्वरासुराचा वध केला होता..
समुद्रमंथनात हलाहल विषानंतर, ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. पद्मपुराण, ब्रह्मखंडानुसार लक्ष्मी देवीचा विष्णूबरोबर विवाह होण्यापूर्वी ज्येष्ठा देवीचा विवाह उद्दालक ऋषींशी करावा लागला. लिंगमहापुराणा(२-६)नुसार अलक्ष्मीचा विवाह दुःसह नावाच्या मुनिब्राह्मणाशी केला होता. [४][५][६]
कल्किपुराणानुसार अलक्ष्मी कलिराक्षसाची दुसरी पत्नी, अधर्म आणि हिंसेची मुलगी, मृत्यूची, अधर्माची माता आहे. आळस, खादाडपणा, मत्सर, क्रोध, ढोंगीपणा, लोभ आणि वासना, असत्य, अस्वच्छता, अनीती, भ्रष्टाचार व अज्ञान यांची देवता. कलियुगात जुगार, दारू, वेश्याव्यवसाय, कत्तल, लोभ येथे राहणे अलक्ष्मीला आवडते.[७]
कल्किपुराण व विष्णूपुराणानुसार, ती कृष्णवर्णी, आरक्तनेत्र, द्विभुज, लांब नाकाची, स्तन व पोट मोठे असलेली, कमळ व काकध्वज धारण करणारी, बैलासारखी तोंड असलेली व कन्यापुत्रसहित असते. केरसुणी हे तिचे आयुध होय.[८]
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केले जाते. अलक्ष्मी ही अशुभाची, दुर्भाग्याची, अपयशाची देवता मानतात. पद्मपुराणात अलक्ष्मीच्या जन्माची कथा वर्णन करण्यात आली आहे. अलक्ष्मीचे वाहन गाढव तर हातात झाडू हे आयुध होते. ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडली आहे. मध्यरात्रीनंतर सुप व दिमडी वाजवून अलक्ष्मीला हाकलून देण्याची प्रथा आहे.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशी कर्कश वाद्ये, फटाके वाजविणे ,मांसाहार टाळावे, कारण त्यामुळे माता लक्ष्मी घरात प्रवेश करीत नाहीत.
बंगालमध्ये आश्विनी अमावस्येस शेणाची 'क्षणिका अलक्ष्मी' बनवून लक्ष्मीप्रमाणेच तिची पूजा करतात व मग तिचे विसर्जन करतात.[१०]
विविध रोगांचा नाश करणाऱ्या देवीसुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे शितलादेवी, मरीआई, गुडघेमोडी माता. विशिष्ट रोग झाल्यावर विशिष्ट देवतेची उपासना केली म्हणजे तो रोग बरा होतो हा समज अगदी प्राचीन काळापासून बघायला मिळतो. वर उल्लेख केलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड गावातील महादेव मंदिरात ही देवी बघायला मिळते. या मंदिरावर असणारी ज्येष्ठा अथवा अलक्ष्मी म्हणजे दुर्मिळ शिल्प आहे.
दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे, तर एका हातात सुरा, आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव दिसते आहे. अत्यंत दुर्मिळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आवडेल.
ज्येष्ठा देवी लक्ष्मीची मोठी बहीण आहे.[१७] महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. आदिवासी जमातीमध्ये ती गावाच्या सीमेवरील एखाद्या गोल दगडाच्या स्वरूपात असते तर कधी ती एखाद्या लाकडाच्या ओबडधोबड मूर्तीच्या रूपात असते. गावाचे, वस्तीचे रक्षण करणारी ती गावदेवी होते. त्याचसोबत देवी ही विविध रोगांचा नायनाट करणारी म्हणूनही प्रस्थापित असते. मग ती सटवाई, मरीआई, अक्काबाई या नावांनी दिसते.[१८]