सरस्वती

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:इतरउपयोग४साचा:माहितीचौकट हिंदू दैवतसरस्वती (Sanskrit: सरस्वती देवी, IAST: 'Sarasvatī') ही ज्ञान, संगीत, कला, विद्या आणि शिक्षणाची हिंदू देवी आहे.[१] ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे.[२]

वैदिक काल

वैदिक काळात सरस्वती ही प्राचीन नदी होती. ऋग्वेद या ग्रंथात तिचा उल्लेख सापडतो. या नदीच्या किनारी ज्ञानाची निर्मिती झाल्याने कालाचा ओघात सरस्वती ही ज्ञानाची देवता मानली जाऊ लागली असे अभ्यासक मानतात.[३]

स्वरूप

चित्रात सरस्वती शुभ्र वस्त्रे नेसलेली आणि अनेकदा कमळावर बसलेली दाखवतात आणि मोर तिच्या बाजूला असतो. हातात वीणा असते. सरस्वतीचे वाहन हंस आहे ; पण जैन पुराणांमधून आणि लोककथांमधून सरस्वती वाहन मोर असल्याचे सांगितले जाते. हिंदू पुराणांनुसार सरस्वती ही विद्येची देवता मानली जाते. माघ महिन्यातल्या शुद्ध पंचमीला वसंत पंचमी वा श्रीपंचमी [४] म्हणतात. या दिवशी सरस्वतीचा जन्म झाल्याने हा दिवस सरस्वती जयंती म्हणून साजरा केला जातो.[५]

सरस्वतीचे वर्णन करणार सुप्रसिद्ध श्लोक

सरस्वती वंदना

या कुन्देन्दुतुषारहारधवला

या शुभ्रवस्त्रावृता

या वीणावरदण्डमण्डितकरा

या श्वेतपद्मासना।

या ब्रह्माच्युतशंकरप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता

सा माम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्याऽपहा ॥[६][७]

शुक्लां ब्रह्मविचार सार परमामाद्यां जगद्व्यापिनीं,

वीणा-पुस्तक-धारिणीमभयदां जाड्यान्धकारापहाम्‌।

हस्ते स्फटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थिताम्‌,

वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्‌॥२॥[८]

संदर्भ यादी

बाह्य दुवे

सरस्वती माता की आरती इन हिंदी - Saraswati Mata Ki Aarti in Hindi. BhaktiSansar.in.