साटवली

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साटवली गाव महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात लांजा बस स्थानकापासून १८ किमीवर मुचकुंदी नदीच्या उजव्या तीरावर वसलेले आहे.लांजा बसस्थानकातून येथे जाण्यासाठी थेट एसटी बससेवा उपलब्ध आहे.खास रिक्षाने सुद्धा येथे जाता येते.


साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

लोकजीवन

मुख्यतः मुस्लिम, भंडारी, वाणी, मराठा समाजातील लोक येथे पूर्वापार स्थायिक आहेत. भातशेती पावसाळ्यात केली जाते तर काजू, आंबे, कोकम, फणस, ह्यांचे उत्पादन अन्य मोसमात घेतले जाते.येथे काही निष्णात शिलाई काम करणारे शिंपी आहेत जे आपला व्यवसाय लांजा, रत्‍नागिरी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन करतात. पावसाळ्याअगोदर खैर झाडापासून खाण्याचा कात बनविण्यासाठी जागोजागी कातभट्ट्या लावल्या जातात. सुमारे तीन महिन्याच्या कालावधीत हे उत्पादन घेतले जाते.

हवामान

पावसाळ्यात येथे भरपूर प्रमाणात पाऊस पडतो आणि हवामान समशीतोष्ण राहते. हिवाळ्यात येथील हवामान थंड असते व सकाळी धुके पडते. उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. पावसाळ्यात येथे भातशेती, नागलीशेती केली जाते.

नागरी सुविधा

येथे राष्ट्रीयीकृत बँक ऑफ इंडियाची शाखा आहे.[१] शेती, दुग्धव्यवसाय,विहीर खोदणे, शेळ्यामेंढ्यापालन, किराणा दुकान,इतर सेवा व्यवसाय इत्यादीसाठी बँक वित्त पुरवठा करते.

संदर्भ

१. https://www.census2011.co.in/census/state/maharashtra.html

२. https://www.mapsofindia.com/lat_long/maharashtra/

३. http://tourism.gov.in/