सिल्लोड

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र सिल्लोड भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक शहर आहे. हे शहर औरंगाबाद जिल्ह्यात असून सिल्लोड तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. सिल्लोड तालुक्यामध्ये वरुड . गोळेगांव, निल्लोड, अजिंठा, शिवना, अंधारी, पळशी, भराडी, आमठाणा मंगरूळ, हट्टी, बहुली, पिरोळ, पालोद, अंभई, देऊळगाव बाजार, [(हळदा)] [ चारनेर]उंडणगांव, इत्यादी खेडी आहेत. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी याच तालुक्यात आहेत. सिल्लोड शहराचे जुने नाव शिवनीतापूर असे आहे. शहरात म्हसोबा महाराजांचे जागृत देवस्थान आहे. दरवर्षी म्हसोबा महाराजांचे जत्रा भरत असते. जत्रेच्या निमित्ताने तिथे जत्रेत रहाटपाळणे, विक्रीसाठी विवध वस्तू असतात. या निमित्ताने बोललेले नवस फेडले जातात.

सिल्लोड तालुक्याचे मुख्य पीक, मका ,मिरची व कापूस आहे. सिल्लोड शहरामध्ये कापूस जिनिंग मिल आहे. दर रविवारी शहरामध्ये आठवडे बाजार असतो.

सिल्लोड तालुक्यामध्ये माध्यमिक व उच्च शिक्षणाची सोय आहे तसेच संगणक संस्था, महाविद्यालये आहेत.

मुरडेश्वर हे शिव मंदिर सिल्लोड तालुक्यात प्रसिद्ध आहे चारनेर हे सिल्लोड तालुक्यातील एक गाव आहे.चारनेर येथील दत्त मंदीर खुप प्रसिद्ध आहे.येथे दरवर्षी दत्त जयंतीनिमित्त भाविक गर्दी करत असतात.चारनेरची लोकसंख्या साधारण 3ते4 हजार आहे.चारनेर हे चारणा नदीच्या काठी वसलेले आहे.येथे हिन्दु मुस्लिम गुण्यागोविंदाने राहतात.येथे चारनेरं मध्यम प्रकल्प आहे त्यावर 10ते15 गावचा प्रश्न मिटतो.चारनेर हे सिल्लोड शहारापासून 27 किलोमीटर अंतरावर आहे.चारनेर हे राज्य महामार्ग 40 वर आहे. साचा:विस्तार(विशाल सोनवणे चारनेर)