सुमती मुटाटकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार साचा:माहितीचौकट गायक

सुमती मुटाटकर(सप्टेंबर १०, इ.स. १९१६ - फेब्रुवारी २८, इ.स. २००७) या हिंदुस्तानी संगीतातील आग्रा घराण्याच्या गायिका व संगीतज्ञ; तसेच दिल्ली विद्यापीठाच्या संगीत विभागात प्राध्यापिका होत्या.

पूर्वायुष्य

सुमतीबाईंचा जन्म भारताच्या उत्तर प्रदेश राज्यात झाला. सुमतीबाईंनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत विषयांतील शिक्षण विविध गुरूंकडून प्राप्त केले. ग्वाल्हेर घराण्याचे पंडित श्रीकृष्ण नारायण रातंजनकर व पंडित. राजाभैय्या पूंछवाले, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसैन खान, पंडित अनंत मनोहर जोशी आणि रामपूर घराण्याचे उस्ताद मुश्ताक हुसैन खान यांच्याकडे त्यांनी आपले संगीत शिक्षण घेतले. त्या पंडित श्रीकृष्ण रातंजनकर यांच्या मार्गदर्शनाखाली लखनौ येथील भातखंडे संगीत संस्थेतही शिकत होत्या.

सांगीतिक कारकीर्द

इ.स. १९५३ मध्ये त्यांनी आकाशवाणीच्या (ऑल इंडिया रेडियो) संगीत विभागाच्या संचालक पदाची सूत्रे स्वीकारली व नंतर त्या संगीत विभागाच्या उप-मुख्य निर्मात्या म्हणूनही काम बघू लागल्या. इ.स. १९६८ मध्ये त्या दिल्ली विद्यापीठातील संगीत व कला विभागात प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. इ.स. १९८१ च्या सप्टेंबर मध्ये त्या विभागाच्या प्रमुखपदावरून त्यांनी निवृत्ती स्वीकारली. तेथील कारकिर्दीत त्यांनी संगीत क्षेत्रातील विविध संशोधन प्रकल्पांना हाताळले, तसेच त्या विषयावर अनेक पुस्तके लिहिली.

२८ फेब्रुवारी २००७ रोजी कोलकाता येथे त्यांचे अल्पशा आजाराने वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांची मुलगी आहे.

पुरस्कार व सन्मान

इ.स. १९७९ मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी फेलोशिपने गौरविण्यात आले. इ.स. १९९९ मध्ये भारत सरकारने त्यांचा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान केला. त्यांना मध्य प्रदेश शासनाने इ.स. २००१ - २००२चा 'कालिदास सन्मान' देऊन त्यांचा गौरव केला होता.

लेखन

  • श्रीकृष्ण नारायण रातंजनकर 'सुजन' : ए मेनी स्प्लेन्डर्ड जीनियस. लोटस कलेक्शन, २००१. (इंग्लिश) ISBN 8174361758
  • गीत निझरी : सुमती मुटाटकर रचित बंदिशों का संग्रह (हिंदी). कनिष्क प्रकाशन, २००२.
  • आस्पेक्ट्स ऑफ इंडियन म्युझिक. संगीत नाटक अकादमी, २००६. (इंग्लिश) ISBN 817871096X
  • सुमती - संगीतभरणम् : जेम्स ऑफ इंडियन म्युझिक अँड म्यूझिकॉलॉजी (प्रो. सुमती मुटाटकर फेलिसिटेशन व्हॉल्यूम) - आभा कुरुक्षेत्र, सुमती मुटाटकर, जगदीश सहाय, १९९४. (इंग्लिश) आयएसबीएन ८१८५२६८३१२

बाह्य दुवे

साचा:हिंदुस्तानी संगीत