सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान
Appearance
सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदानाला, खांदेरी क्रिकेट मैदान (लायन्स डेन) म्हणूनही ओळखले जाते. हे मैदान भारतातील गुजरात राज्यातील राजकोट येथे आहे. हे गुजरातचे पहिले सौर सुसज्ज असे मैदान आहे.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
सुरुवातीला जेव्हा प्रेक्षकांच्या आसनव्यवस्थेचे बांधकाम चालू असताना हे मैदान रणजी करंडक स्पर्धेसाठी वापरले जात असे.[१] आसनव्यवस्था पूर्ण झाल्यानंतर मैदानाची एकूण प्रेक्षकक्षमता २८००० इतकी झाली. हे मैदान एका फारत मोठ्या क्रिडा संकुलाचा एक भाग आहे, ज्यामध्ये बॅडमिंटन, बास्केटबॉल, आणि व्हॉलीबॉल या खेळांची सुद्धा मैदाने आहेत. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सामने हे मैदान आणि माधवराव सिंधिया क्रिकेट मैदान ह्या दोन्ही ठिकाणी होतात.
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ http://www.hindustantimes.com/News-Feed/domesticcricket/Antigua-fever-pitch-reaches-Rajkot/Article1-379759.aspx + साचा:मृत दुवा ...संपादनासाठी शोधसंहिता वापरली.